मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

भारतापेक्षा पाकिस्तानचाही 'स्पीड' जास्त; नेपाळही आपल्या पुढे, 'या' शर्यतीत देश पडतोय मागे

भारतापेक्षा पाकिस्तानचाही 'स्पीड' जास्त; नेपाळही आपल्या पुढे, 'या' शर्यतीत देश पडतोय मागे

भारत या स्पीडमध्ये दक्षिण कोरिया, श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तानसारख्या देशांच्याही मागे आहे. आहे. सप्टेंबर 2020 साठी जारी करण्यात आलेल्या इंडेक्समध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

भारत या स्पीडमध्ये दक्षिण कोरिया, श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तानसारख्या देशांच्याही मागे आहे. आहे. सप्टेंबर 2020 साठी जारी करण्यात आलेल्या इंडेक्समध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

भारत या स्पीडमध्ये दक्षिण कोरिया, श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तानसारख्या देशांच्याही मागे आहे. आहे. सप्टेंबर 2020 साठी जारी करण्यात आलेल्या इंडेक्समध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

  • Published by:  Karishma Bhurke
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : मोबाईल अपलोड स्पीडचा, ग्लोबल अ‍ॅव्हरेज स्पीड 11.22Mbps आहे. भारत यात अतिशय मागे आहे. भारतातील अ‍ॅव्हरेज अपलोड स्पीड 4.31 Mbps आहे. Ookla कडून जारी करण्यात आलेल्या Speedtest Global Index मध्ये भारत मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये 131व्या क्रमांकावर आहे. भारत या स्पीडमध्ये दक्षिण कोरिया, श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तानसारख्या देशांच्याही मागे आहे. भारतात सरासरी मोबाईल डाउनलोड स्पीड 12.07 Mbps आहे, तर जागतिक सरासरी 35.26 Mbps आहे. सप्टेंबर 2020 साठी जारी करण्यात आलेल्या इंडेक्समध्ये हा खुलासा करण्यात आला आहे. फिक्स्ड ब्रॉडब्रँड स्पीडमध्ये भारताला, इंडेक्समध्ये 70व्या स्थानावर ठेवण्यात आलं आहे. मोबाईल इंटरनेट स्पीड इंडेक्सनुसार, साऊथ कोरियाची सर्वात चांगल्या 121 Mbps इंटरनेट स्पीडमध्ये नोंद करण्यात आली आहे. तर भारत 138 देशांच्या या स्पीडमध्ये 131व्या क्रमांकावर आहे. Speedtest Global Index जगभरातील इंटरनेट स्पीडचा मासिक डेटा जमा करतो. जगभरात लाखो-करोडो लोक मोबाईल फोनचा वापर करतात, आणि त्यांच्या रियल डेटाच्या आधारे स्पीडटेस्टनुसार, रँकिंग तयार केली जाते. (वाचा - wifi मध्ये अडथळे येतात? या सोप्या ट्रिक्सनी इंटरनेट होईल सुपरफास्ट) गेल्या महिन्यात भारतात ब्रॉडब्रँड स्पीडमध्ये वाढ झाली आहे. भारत सप्टेंबर महिन्यात ब्रॉडब्रँड स्पीडमध्ये 70व्या स्थानावर होता. ब्रॉडब्रँड स्पीडमध्ये सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे. सिंगापूरमध्ये ब्रॉडब्रँडवर 226Mbps इंटरनेट स्पीडची नोंद करण्यात आली आहे. ब्रॉडब्रँडमध्ये भारताची स्थिती नेपाळ आणि पाकिस्तानहून चांगली आहे. मार्च महिन्यानंतर भारतात मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर ब्रॉडब्रँड स्पीडमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्चमध्ये कोरोना काळात लॉकडाऊन करण्यात आलं आणि डेटा वापरात अचानक मोठी वाढ नोंदवली गेली. (वाचा - FAU-G चा टीजर पाहून PUBG ला विसराल! मॅपमध्ये दिसणार भारतातील हे ठिकाण) या देशात सर्वात फास्ट इंटरनेट - सिंगापूर 175 देशांच्या रँकिंगमध्ये 226.60 Mbps स्पीडसह इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. Ookla ग्लोबल इंडेक्सनुसार, सरासरी मोबाईल डेटा स्पीडमध्ये दक्षिण कोरिया पहिल्या क्रमांकावर आहे. नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि चीन, मोबाईल डेटा स्पीडमध्ये भारताच्या तुलनेत बरेच पुढे आहेत.

(वाचा - देशात कोणतं Aadhaar Card आहे मान्य; UIDAI ने दिली संपूर्ण माहिती)

दरम्यान, 4G 5G कडे वाटचाल करणाऱ्या भारतात डिजिटल इंडिया मिशन सुरू आहे. सरकारकडून डिजिटल साक्षरतेकडे अधिक जोर देण्यात येत आहे. मात्र मोबाईल किंवा ब्रॉडब्रँड डेटा स्पीडमध्ये भारताचा क्रमांक चिंताजनक आहे.
First published:

Tags: Internet, Mobile

पुढील बातम्या