इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर घरात एक असं बेसिक मॉडेम राउटर इन्स्टॉल करतात, ज्यामुळे सिग्नल संपूर्ण घरात पोहचत नाही. त्यामुळे राउटर घरात मधोमध इन्स्टॉल करा. घराच्या एखाद्या कोपऱ्यात राउटर असल्यास वाय-फाय सिग्नल ट्रान्समिशनमध्ये अनेक अडथळे येतात. राउटर सेंटरला लावलं असल्यास घरात संपूर्ण ठिकाणी सिग्नल मिळेल.
घरातील कोपऱ्यात अनेकदा सिग्नल पोहचत नाही. अशावेळी रिपीटर इन्स्टॉल करून, तो आपल्या राउटरकडून वाय-फाय सिग्नल रिसिव्ह करेल आणि त्याचा कव्हरेज एरिया वाढवेल. रिपीटरशी कनेक्ट होण्यासाठी डब्लूपीएस सर्वात सोपा मार्ग आहे. त्यासाठी आपल्या राउटरच्या डब्लूपीएसला इनेबल करा आणि सोबतच रिपीटर डब्लूपीएस बटन ऑन करावं लागेल.