भारतात BS6 उत्सर्जन मानक लागू झाल्यामुळे काही कंपन्यांनी त्यांच्या काही गाड्यांचं उत्पादन बाजारात बंद केलं आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला होंडाने BR-V SUV बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. होंडाने या एसयूव्हीला नव्या उत्सर्जन मानक BS6 (BS6 Emmission Standard) मध्ये अपग्रेड केलं नाही. कंपनीने ही कार मे 2016 मध्ये लाँच केली होती.
हुंदाई मोटर इंडियानेही Xcent सेडान अधिकृत वेबसाईटवरून हटवली आहे. कंपनीने Aura नावाने 2020 च्या सुरुवातील लाँच केली होती. परंतु बाजारात Xcent च्या तुलनेत दुसऱ्या जनरेशनच्या हुंदाई i10 ची मागणी अधिक होती. (Photo: News18.com)
या वर्षात निसाननेही दोन मॉडेल्स भारतीय बाजारातून हटवल्या आहेत. BS6 उत्सर्जन मानक अनिवार्य करण्यात आल्यामुळे निसानने Micra Hatchbak आणि Sunny सेडान कार भारतीय बाजारात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Micra Hatchbak कार जवळपास एक दशकापूर्वी भारतात लाँच झाली होती. कंपनीने 2014 मध्ये या कारला अपडेटही केलं होतं. मात्र आता ही कार भारतीय बाजारात बंद करण्यात आली आहे.
Renault India नेही आपल्या अधिकृत पेजवरून एक फ्लॅगशिप कार हटवली आहे. कंपनीने रेनॉ Captur SUV हटवली आहे. ही कार BS4 इंजिनसह होती. कंपनीने 2017 मध्ये ही लाँच केली होती.