मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

कार घेताय? तर Hyundai Aura करा फक्त 10,000 मध्ये बूक!

कार घेताय? तर Hyundai Aura करा फक्त 10,000 मध्ये बूक!

हुंदई (Hyundai) Aura ही एक्सेंटचा  नवा अवतार आहे. या कारची बाजारपेठेत मारूती सुझुकीच्या (Dzire) आणि होंडा एमेज (Amaze) शी सामना होणार आहे

हुंदई (Hyundai) Aura ही एक्सेंटचा नवा अवतार आहे. या कारची बाजारपेठेत मारूती सुझुकीच्या (Dzire) आणि होंडा एमेज (Amaze) शी सामना होणार आहे

हुंदई (Hyundai) Aura ही एक्सेंटचा नवा अवतार आहे. या कारची बाजारपेठेत मारूती सुझुकीच्या (Dzire) आणि होंडा एमेज (Amaze) शी सामना होणार आहे

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 03 जानेवारी : हुंदई (Hyundai) मोटर इंडिया लिमिटेड  (HMIL) आपली कॉम्पॅक्ट सिडान Aura लाँच करणार आहे. आता या कारच्या बुकिंगची सुरूवात केली आहे. कंपनीने मागील डिसेंबर महिन्यात 19 तारखेला  Aura ची झलक दाखवली होती. त्यानंतर अधिकृतरित्या 21 जानेवारी रोजी ही कार लाँच होणार आहे. या कारची किंमत 5.8 लाख ते 8.7 लाख असण्याची शक्यता आहे.

असं करा Hyundai Aura चं बुकिंग?

HMIL ने Hyundai Aura चे पेट्रोल आणि डिझेल व्हर्जन लाँच करणार आहे. कंपनीकडून फक्त 10,000 रुपयांचं डाऊनपेमेंट करून तुम्ही Aura बूक करू शकतात, अशी ऑफर जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही हुंदईच्या अधिकृत वेबसाईट आणि हुंदईच्या डिलरकडून या कारचे बुकिंग करू शकता.

अशी आहे हुंदई Aura

हुंदई (Hyundai) Aura ही एक्सेंटचा  नवा अवतार आहे. या कारची बाजारपेठेत मारूती सुझुकीच्या (Dzire) आणि होंडा एमेज (Amaze) शी सामना होणार आहे. कंपनीने Aura ला पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये लाँच केली आहे. सोबतच ही कार बीएस-6 मानांकनासह विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

डिझाइन

ज्या प्रकारे हुंदाईची एक्सेंट, ग्रँड आणि आय10 वर तयार झाली होती, तशीच Aura ही सुद्धा Grand i10 Nios वर तयार झाली आहे. असं यासाठी सांगतोय कारण, या कारचा समोरून लूक पाहिला तर सेम Nios सारखा आहे. यामध्ये सेटिन फ्रंट ग्रिल, प्रोजेक्टर टाइप, हेडलॅम्स आणि फॉग लॅम्पससह R15 Diamond Cut अलॉय व्हिलस दिले आहे. कारच्या रिअरमध्ये स्पोर्टी बंपर दिला आहे. तसंच 3D आउटर लेंससोबत LED टेललॅम्प दिले आहे.

इंजिन

या कारमध्ये कंपनीने BS6 सह पेट्रोल आणि डिझेल इंजिन दिले आहे. या कारची चांगली गोष्ट म्हणजे, ही कार कमी व्हायब्रेशन होते आणि चांगल्या परफॉर्मन्ससह जास्त मायलेजही देईल. तसंच हुंदाई AURA देशातील पहिली आपल्या सेग्मेंटमध्ये अशी सिडान कार आहे, ज्यामध्ये BS6 Turbo Charged Petrol Engine दिले आहे.

ऑराचं इंजिन हे 83bhp पॉवर देणारे 1.2-litre BS-VI T-GDI पेट्रोल इंजिन, 100bhp पॉवर देणारे 1.0-litre turbo petrol इंजिन आणि 75hp ताकद देणारे डिझेल इंजिन मिळणार आहे.

इंटेरिअर

हुंदाईने या कारमध्ये 8 इंच इतक्या मोठ्या टचस्क्रीनचा इन्फोटेनमेंट सिस्टम दिला आहे. जो Android Auto आणि Apple CarPlay दोघांनीही सपोर्ट करतो. तसंच यामध्ये Arkamys Premium साऊंड, 5.3 इंचाचा डिजीटल स्पीडोमिटर आणि मल्टी इनफॉर्मेशन डिस्प्लेसह वायरलेस चार्जिंग सारखे फिचर्स दिले आहे.

First published: