नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : नुकतंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर काही वर्षांमध्ये बंदच करायचा असल्याचं वक्तव्य केलं होतं. ही अतिशयोक्ती वाटत असली, तरी सध्या संपूर्ण जगच पेट्रोल-डिझेलला पर्याय (Option for Petrol-Diesel) शोधत आहे. याला इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Vehicles) पर्याय सध्या उपलब्ध असला, तरी त्या वाहनांचं मायलेज, चार्जिंग स्टेशनचा अभाव आणि चार्जिंगसाठी लागणारा वेळ या बऱ्याच अडथळ्यांना पार करावं लागणार आहे. मात्र, सध्या इलेक्ट्रिक वाहनांपेक्षाही उत्तम पर्याय आपल्याकडे उपलब्ध होतो आहे, तो म्हणजे हायड्रोजन (Hydrogen Fuel) इंधनाचा. सध्या हायड्रोजन इंधन हे महाग असलं, तरी भविष्यात त्याची किंमत अगदीच कमी होऊ शकते. कारण आयआयटीतील संशोधकांनी आता पाण्यापासून हायड्रोजन वेगळा (Separate Hydrogen from Water) करण्याची पद्धत शोधून काढली आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत सूर्यप्रकाशाचा (Separate Hydrogen with help of Sunlight) वापर केला जाणार आहे. तिलकामांझी भागलपूर विद्यापीठातील रसायनशास्त्र विषयाचे निवृत्त संशोधक विवेकानंद मिश्र यांनी याबाबत माहिती दिली आहे.
नॅशनल हायवेवरील ढाब्यावर मिळणार पेट्रोल, काय आहे नितीन गडकरींची योजना?
पेट्रोल-डिझेलपेक्षा स्वच्छ आणि शक्तिशाली - प्रा. मिश्र यांनी सांगितलं, की ‘हायड्रोजन इंधन हे पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत अधिक स्वच्छ (Hydrogen is safer than petrol) आणि अधिक ऊर्जा देणारं (Hydrogen Fuel more powerful) इंधन आहे. एक किलो हायड्रोजन गॅसमध्ये नॅचरल गॅसच्या तुलनेत 2.6 टक्के अधिक एनर्जी असते. ही ऊर्जा साठवून ठेवली जाऊ शकते, आणि गरजेनुसार वापरताही येतं. जर हे इंधन बनवण्याची प्रक्रिया अधिक स्वस्त झाली, तर हा पेट्रोल-डिझेलला एक उत्तम पर्याय (Hydrogen fuel is a better option) होऊ शकतो. ते पुढे म्हणाले, ‘ही काही आताची संकल्पना नाही. अगदी 1839 सालीच फ्यूम सेल्सचा सिद्धांत मांडला गेला होता. पुढे 1841 मध्ये जॉन्स्टन नावाच्या इंजिनिअरने ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या मिश्रणावर चालणारं इंजिन बनवलं होतं. अर्थात, ऑक्सिजन आणि हायड्रोजन तयार करणं ही महागडी प्रक्रिया असल्यामुळे याचा मोठ्या स्तरावर वापर करण्यात आला नाही.’
Petrol Price Today:ऑक्टोबर महिन्यात 5 रुपयांहून अधिक महागलं पेट्रोल-डिझेल
आता स्वस्तात तयार होणार हायड्रोजन - हायड्रोजनची स्वस्तात निर्मिती करण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. आयआयटी गुवाहाटीमध्ये सूर्यप्रकाशाच्या मदतीने पाण्यातील ऑक्सिजन आणि हायड्रोजनला वेगळं करण्याबाबत संशोधन सुरू आहे. ‘जर्नल ऑफ फिजिकल केमिस्ट्री लेटर्स’ या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे. अमेरिकन केमिकल सोसायटीकडून या नियतकालिकाचं प्रकाशन केलं जातं. आयआयटी गुवाहाटीमधील प्रा. कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फोटोइलेक्ट्रोकेमिकल सेल पाण्यासारख्या सहज उपलब्ध असणाऱ्या घटकापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे करण्यासाठी सौर उर्जेचा वापर करते. सध्या हायड्रोजन इंधन महाग असलं, तरी गेल्या वर्षी जवळपास 8,500 हायड्रोजन फ्यूल सेल वाहनं विकली गेली आहेत. एवढंच नव्हे, तर टोयोटाच्या मिराई (Mirai car record) फ्यूएल सेल कारने 5.7 किलो इंधनात 1,352 किलोमीटर प्रवास करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यातूनच या इंधनाच्या शक्तीचा अंदाज येऊ शकतो. म्हणजेच, हायड्रोजन इंधन स्वस्तात उपलब्ध झाल्यास, तो पेट्रोल-डिझेल किंवा सध्याच्या कोणत्याही इंधनाला उत्तम पर्याय ठरू शकेल.