मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुमच्या स्मार्टफोनवर 5G सुरू करायचंय? Airtel, Jio, Vi युजर्सनी या सोप्या स्टेप्स फॉलो करा

तुमच्या स्मार्टफोनवर 5G सुरू करायचंय? Airtel, Jio, Vi युजर्सनी या सोप्या स्टेप्स फॉलो करा

तुमच्या स्मार्टफोनवर 5G सुरू करायचंय?

तुमच्या स्मार्टफोनवर 5G सुरू करायचंय?

5G लॉन्च झाल्यानंतर, जर तुम्हाला फोनमध्ये 5G सेवा वापरायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 2 ऑक्टोबर : देशभरात 1 ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. एअरटेलने कालपासून देशातील 8 प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, वाराणसी, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, सिलीगुडी आणि कोलकाता यांचा समावेश आहे. इतर कंपन्याही येत्या काही दिवसांत 5G सेवा देण्यास तयार आहेत. काही वापरकर्ते 5G अनुभव घेण्यासाठी 5G फोन खरेदी करत आहेत आणि काही वापरकर्त्यांकडे आधीपासून 5G सपोर्टेड डिव्हाइसेस आहेत.

5G सेवा वापरण्यासाठी फक्त 5G स्मार्टफोन असून उपयोग नाही. ही सेवा सुरू करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. Airtel, Jio आणि Vodafone Idea (Vi) वापरकर्त्यांना त्यांच्या फोनमध्ये 5G चालवण्यासाठी काही सेटीग्ज कराव्या लागतील.

1- सर्वप्रथम, तुमच्या परिसरात 5G उपलब्ध आहे की नाही हे तुमच्या ऑपरेटरकडे तपासा. तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही Jio, Airtel किंवा Vi च्या कस्टमर केअरशी बोलू शकता.

2- ऑपरेटरकडे तुमच्या क्षेत्रात 5G असल्यास, तुमच्या फोनमध्ये Jio, Airtel किंवा Vi द्वारे ऑफर केलेल्या 5G बँडसाठी सपोर्ट असल्याची खात्री करा.

3- आता तुमच्या 5G स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जा, त्यानंतर मोबाईल नेटवर्क पर्यायावर क्लिक करा.

वाचा - 5G वापरणार असाल तर हे धोकेही लक्षात ठेवा; बँक ते खाजगी माहिती होऊ शकते हॅक

4- तुम्हाला ज्या ऑपरेटरसाठी 5G कनेक्टिव्हिटी एनेबल करायची आहे तो ऑपरेटर निवडावा लागेल.

5- सिम 1 किंवा सिम 2 वर क्लिक करा आणि पसंतीचे नेटवर्क प्रकार मिळविण्यासाठी खाली स्क्रोल करा.

6-आता 5G/4G/4G/2G (ऑटो) मधून पर्याय निवडा. जेणेकरुन तुमचा स्मार्टफोन तुमच्या परिसरात चालणारे 5G नेटवर्क आपोआप ओळखू शकेल आणि तो तुमच्या फोनवर डीफॉल्ट डेटा कनेक्टिव्हिटी पर्याय बनवू शकेल.

7- तुम्हाला तुमच्या फोनवरील सॉफ्टवेअर अपडेट करावे लागेल. त्यामुळे 5G शी संबंधित कोणत्याही वैशिष्ट्यासाठी कोणतेही अपडेट आले आहे का हे जाणून घेण्यासाठी सेटिंग्ज तपासा.

8- आता तुमचा फोन रीस्टार्ट करा. जर तुमच्या सर्कल/क्षेत्रात 5G उपलब्ध असेल तर ते कार्य करण्यास सुरवात करेल.

किंमत जाहीर नाही

5G चा स्पीड 4G पेक्षा 10 पट जास्त असेल, त्यामुळे अधिक बँडविड्थ लागेल असे मानले जाते. सध्या कंपनीने 5G प्लानच्या किंमतीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. आशा आहे की किंमत देखील लवकरच सादर केली जाईल.

First published:

Tags: 5G, Smartphone