मुंबई ११ नोव्हेंबर : व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. सध्याच्या काळात कोट्यवधी युजर्स या अॅपचा प्राधान्याने वापर करतात. मित्र, कुटुंबीय, नातेवाईक आणि ऑफिसमधल्या सहकार्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी व्हॉट्सअॅप हे सर्वांत उपयुक्त असं माध्यम ठरलं आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपण व्हिडिओ, फोटो, ऑडिओ, कंटेट, फाईल्स शेअर करू शकतो. युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवीन फीचर्स लॉंच करत असतं.
बऱ्याचदा अनावधानाने आपले व्हॉट्सअॅप चॅट्स डिलीट होतात. त्याचप्रमाणे स्मार्टफोन बदलल्यानंतर नवीन स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप डाउनलोड केल्यावर जुने मेसेज त्यावर दिसतातच असं नाही. यामुळे आपली मोठी गैरसोय होते. मात्र व्हॉट्सअॅपवर डिलिट झालेले मेसेज पुन्हा रिकव्हर करता येतात.
यासाठी तुम्ही थर्डपार्टी अॅप्सचा वापर करू शकता. तसंच मेसेज डिलीट झाल्यास अडचण निर्माण होऊ नये, यासाठी खास दक्षतादेखील घेऊ शकता. या विषयी सविस्तर जाणून घेऊया.
व्हॉट्सअॅपवरील मेसेज चुकून डिलीट झाल्यास अडचण निर्माण होऊ नये यासाठी सातत्यानं चॅट बॅकअप घेणं आवश्यक आहे. यासाठी अँड्रॉइड डाटा रिकव्हरीसारखी सॉफ्टवेअर फायदेशीर ठरतात. व्हॉट्सअॅपमध्ये ‘चॅट बॅकअप’ नावाचा ऑप्शन आहे.
हा तुम्ही मॅन्युअली सेट करू शकता. या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही रोज बॅकअप घेऊ शकता. त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅपचा वापर तुम्ही स्मार्टफोन आणि पीसीवर केल्यासही फायदा होतो.
तुमच्या फेव्हरेट कॉन्टॅक्टवरून व्हॉट्सअॅपवर येणारे फोटो आणि व्हिडिओ तुम्ही थेट डाउनलोड करू शकता. यासाठी तसा ऑप्शनही असतो. त्यामुळे बॅकअप घेण्याची गरज नसते. तुम्ही तुमची चॅट अर्काइव्ह करू शकता. यामुळे कोणताही टेक्स्ट मेसेज डिलीट होत नाही.
पुरेशी काळजी घेऊन देखील व्हॉट्सअॅपवरील मेसेज डिलीट झाला तर तो रिकव्हर करण्यासाठी काही पद्धती आहेत. या पद्धतीचा वापर अँड्रॉइड आणि आयओएस असे दोन्ही युजर्स करू शकतात. तुम्ही डिलीट झालेला व्हॉट्सअॅप मेसेज क्लाउड बॅकअपवरून सहजपणे रिकव्हर करू शकता.
यासाठी अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सअॅप रिइन्स्टॉल करावे. त्यानंतर अॅग्री अँड कंटिन्यू हे बटण दाबून प्रोसिड म्हणावं. तुमचा मोबाईल क्रमांक टाकून कन्फर्म करा. त्यानंतर तुम्हाला फोनवर एक व्हेरिफिकेशन कोड येईल आणि ऑटोमॅटिक व्हॉट्सअप रीड करेल. यानंतर तुम्हाला रिस्टोअर असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुमचे जुने मेसेज क्लाउडवरून रिस्टोअर होतील.
या शिवाय लोकल बॅकअपच्या मदतीनं तुम्ही मेसेजेस रिकव्हर करू शकता. तसंच काही थर्ड पार्टी अॅप्सच्या मदतीनं देखील डिलीट झालेले व्हॉट्सअॅप मेसेज रिकव्हर करता येतात. यासाठी गुगल ड्राइव्ह किंवा डेटा रिकव्हरी या पर्यायांचा वापरही करता येतो. त्यामुळे तुमच्याकडून व्हॉट्सअॅपवरील एखादा मेसेज चुकून डिलीट झाला तर तुम्ही तो परत रिस्टोअर करू शकता.
व्हॉट्सअॅप तुमचे मागील सात दिवसांचे मेसेज स्टोअर करून ठेवतं आणि रोज मध्यरात्री दोन वाजता बॅकअप घेऊन तुमच्या फोनमध्ये स्टोअर करतं. त्यामुळे तुम्ही डिलीट मेसेज पुन्हा मिळवू शकता. व्हॉट्सअॅपदेखील अशा प्रकारच्या सुविधेसाठी काम करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Viral news, Whatsaap, Whatsapp messages