मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /कुठे फिरतेय तुमची जवळची व्यक्ती? व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीनं शोधा Live Location

कुठे फिरतेय तुमची जवळची व्यक्ती? व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीनं शोधा Live Location

कुठे फिरतेय तुमची जवळची व्यक्ती? व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीनं शोधा Live Location

कुठे फिरतेय तुमची जवळची व्यक्ती? व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीनं शोधा Live Location

Location Share: आपण आपल्या मित्राच्या स्थानाबद्दल सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला जास्त मेहनतही करावी लागणार नाही. यासाठी तुम्हाला गुगल मॅप आणि व्हॉट्सअॅपची मदत घ्यावी लागेल. आज आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही मित्रांचे लाईव्ह लोकेशन पाहू शकता.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 ऑगस्ट: तुम्हाला तुमचं मित्र किंवा मैत्रिण नेमकी कुठं आहे, हे जाणून घ्यायचं आहे का? हे करण्याचा एक सोपा मार्ग आहे. मात्र  यासाठी तुमच्या मित्राच्या फोनमध्ये मोबाईल डेटा/वाय-फाय आणि जीपीएस चालू असणं आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर त्यांचं लाईव्ह लोकेशन (Live Location)  पाहू शकता.

अशा परिस्थितीत कोणाच्याही परवानगीशिवाय त्याचे ठिकाण शोधणं बेकायदेशीर आहे. परंतु, आम्ही येथे सांगत असलेल्या पद्धतीनं तुम्ही कोणत्याही कायदेशीर अडचणीशिवाय मित्राचं लोकेशन सहज शोधू शकता.

गुगल मॅप्स आणि व्हॉट्सअ‍ॅप करतील मदत-

यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अ‍ॅप्सचे फीचर्स वापरावे लागतील. सध्या बरेच लोक गुगल मॅप (Google Map) आणि व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) वापरतात. यामुळं आम्ही तुम्हाला गुगल मॅप आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून लाइव्ह लोकेशनची माहिती कशी मिळवायची, हे सांगणार आहोत.

यासाठी तुम्हाला ज्या मित्राचं लोकेशन जाणून घ्यायचं असेल, त्याच्याशी बोलणं आवश्यक आहे. मग ते तुमचं लोकेशन तुमच्यासोबत Google Maps किंवा WhatsApp वर शेअर करू शकतात. ज्याद्वारे तुम्हाला त्यांची माहिती मिळू शकते. दोन्ही अ‍ॅप्समध्ये लोकेशन शेअरिंगचा पर्याय देण्यात आला आहे.

हेही वाचा- Online Shopping Apps: ऑनलाईन खरेदी करायचीये? ही आहेत बेस्ट 5 शॉपिंग अ‍ॅप्स

 Location Sharing चालू करणं आवश्यक आहे?

यासाठी गुगल मॅपवर तुमच्या मित्राला लोकेशन शेअरिंगच्या पर्यायावर जावं लागेल. यानंतर तुमचा मित्र त्याचं लोकेशन तुमच्यासोबत शेअर करू शकतो. तर ज्या लोकांसोबत तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर लाईव्ह लोकेशन शेअर करू इच्छिता, त्यांचा चॅट ओपन करून, तुम्हाला पाठवल्या जाणार्‍या आयटम्सच्या पर्यायातून लोकेशनचा पर्याय निवडावा लागेल.

येथून थेट लोकेशन शेअर केलं जाऊ शकतं. यासाठी, तुम्ही विशिष्ट कालावधी देखील निवडू शकता. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या पद्धतींबद्दल अनेकांना माहितीही असते, परंतु अजुनही अनेक लोकांना याची माहिती नाही. परंतु कुणाच्या परवानगीशिवाय असं करणं गुन्हा आहे. त्यामुळं लोकेशन शेअर करण्यापूर्वी, मित्राची परवानगी नक्की घ्या.

First published:

Tags: Whatsapp