सर्वात आधी SIM card lock करावं लागेल. सिम कार्ड लॉक करण्यासाठी आपल्या नेटवर्क प्रोव्हाडरला कॉल करावा लागेल. त्यानंतर फोनवर अकाउंट परत सेटअप करणं शक्य होणार नाही.
सिम कार्ड लॉक झाल्यानंतर युजरकडे दोन पर्याय असतील. आपल्या नव्या फोनवर व्हॉट्सअॅप अॅक्टिव्हेट करण्यासाठी त्याच नंबरसह एका नव्या सिम कार्डचा वापर करा. चोरी झालेल्या फोनवर आपलं अकाउंट अॅक्टिव्हेट करण्याचा हा सर्वात जलद पर्याय आहे. WhatsApp Account एका वेळी केवळ एका डिव्हाईसवर, एका फोन नंबरसह अॅक्टिव्हेट केलं जाऊ शकतं.
दुसरा पर्याय अकाउंट डिअॅक्टिव्हेट करण्याचा आहे. त्यासाठी युजरला कंपनीला "Lost/Stolen: Please deactivate my account" असा ईमेल करावा लागेल आणि फोन नंबर आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये (+91) लिहावा लागेल. एकदा डिअॅक्टिव्हेट झाल्यानंतरही Contacts तुमचं प्रोफाईल पाहू शकतात आणि मेसेज पाठवू शकतात. हे 30 दिवसांपर्यंत Pending State मध्ये राहील. जर युजरने 30 दिवसांपर्यंत अकाउंट सक्रिय केलं नाही, तर ते अकाउंट पूर्णपणे हटवलं जातं.
सिम कार्ड लॉक आणि फोन सर्विस Disabled झाल्यानंतरही, व्हॉट्सअॅपचा वापर वाय-फायवर केला जाऊ शकतो, जर युजरने कंपनीशी अकाउंट डिअॅक्टिव्हेटसाठी संपर्क केला नसेल, तसंच जर युजरने Google drive, iCloud किंवा OneDrive चा वापर करुन आधीपासून बॅकअप घेतला असेल, तर तो चॅट हिस्ट्री रिस्टोर करू शकतो.