मुंबई, 3 जून : स्मार्टफोन हा सध्या आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक झाला आहे. एक वेळ जेवणाशिवाय राहणं शक्य आहे; मात्र स्मार्टफोनशिवाय (Smartphone) राहणं केवळ अशक्य आहे. अशातच स्मार्टफोन हरवला वा चोरी झाला तर? वाचूनच अंगावर काटा आला ना? मात्र घाबरू नका. तुमचा हरवलेला स्मार्टफोन शोधण्यासाठी (Find Lost Smartphone) अँड्रॉइड आणि अॅपलने आधीच बरीचशी फीचर्स फोनमध्ये दिलेली आहेत. कशी आहेत ही फीचर्स आणि त्यांचा कसा वापर करायचा, हे जाणून घेऊ या.
अँड्रॉइडचं ‘फाइंड माय डिव्हाइस’ फीचर
अँड्रॉइड 2.3 किंवा त्यापुढील कोणत्याही अँड्रॉइड व्हर्जन असणाऱ्या स्मार्टफोनवर हे फीचर (Find My Device) वापरता येतं. यासाठी तुम्हाला सर्वांत आधी सेटिंग्ज मध्ये जायचं आहे. त्यानंतर गुगल या पर्यायावर क्लिक करून, पुढे फाइंड माय डिव्हाइस हा पर्याय निवडायचा आहे. किंवा मग, तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन थेट फाइंड माय डिव्हाइस हे फीचर (Find My Android Device) सर्च करू शकता. ‘फाइंड माय डिव्हाइस’ हे सेटिंग तुम्हाला कायम ऑन ठेवायचं आहे. यानंतर तुम्ही समोरच्या पर्यायांमधून वेब अॅप किंवा फोन वा टॅबलेट अॅप यांपैकी एक पर्याय निवडू शकता. यानंतर तुम्हाला मॅपवर तुमचा फोन कुठे आहे याचं लोकेशन दिसेल.
तुमच्या फोनची बॅटरी पुरेशी चार्ज्ड असेल आणि इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही गुगलच्या मदतीने बरंच काही करू शकता. तुम्ही तुमच्या फोनमधली महत्त्वाची माहिती डिलिट करू शकता. तुम्ही तुमच्या हरवलेल्या फोनवरून दुसऱ्या एखाद्या नंबरवर कॉल करू शकता. अगदीच गरज भासली, तर तुम्ही तुमचा फोन फॅक्टरी रीसेटही (Factory reset lost smartphone) करू शकता. अर्थात, फॅक्टरी रीसेट प्रोटेक्शन (FRP) सुविधा ही केवळ अँड्रॉइड 5.0 लॉलीपॉप आणि त्यापुढील अँड्रॉइड व्हॅरियंट्सनाच उपलब्ध आहे. तुमचा फोन फॅक्टरी रीसेट केल्यानंतर केवळ तुम्हीच तो अनलॉक करू शकता. त्यामुळे तो फोन कोणी चोरी केला असेल, तरी त्या व्यक्तीला त्यातली माहिती पाहता वा वापरता येत नाही.
आयफोनचं ‘फाइंड माय आयफोन’
ज्याप्रमाणे अँड्रॉइडचं फाइंड माय डिव्हाइस फीचर आहे, अगदी तसंच आयओएस सॉफ्टवेअरवर चालणाऱ्या सर्व स्मार्टफोनमध्ये फाइंड माय आयफोन (Find My iPhone) हे फीचर असतं. हे ऑन करण्यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन, तुमच्या अॅपल आयडीवर (Apple ID) क्लिक करावं लागेल. त्यानंतर समोर आलेल्या पर्यायांमधून फाइंड माय आयफोन हा पर्याय निवडा. त्यानंतर फाइंड माय शीट हा पर्याय दिसेल आणि त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला फाइंड माय आयफोन हा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर हे फीचर (How to find lost iPjhone) ऑन होईल. हे फीचर कायम ऑनच ठेवायचं आहे. सोबतच फाइंड माय नेटवर्क आणि सेंड लास्ट लोकेशन हे पर्यायही ऑन करायचे आहेत. यामुळे तुमच्या फोनची इंटरनेट सेवा बंद झाली असली, तरीही तो शेवटी कोणत्या लोकेशनला होता हे तुम्हाला कळू शकतं.
हरवलेला आयफोन शोधण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या एखाद्या अॅपल डिव्हाइसवरून लॉगिन करावं लागणार आहे. त्यानंतर सेटिंग्जवर क्लिक करून तुमच्या अॅपल आयडीवर क्लिक करा. त्यानंतर खाली स्क्रोल करत गेलात, तर तुम्हाला तुमच्या सर्व डिव्हाइसेसची यादी दिसेल. यामधल्या हरवलेल्या डिव्हाइसवर टॅप केल्यानंतर त्या डिव्हाइसची इन्फो शीट (Apple Find my utility service) तुम्हाला दिसेल. त्यातून तुम्ही थेट ते डिव्हाइस सर्च करू शकाल. यानंतर तुम्हाला फाइंड माय डिव्हाइस पर्यायावर टॅप करायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला मॅपवर तुमच्या डिव्हाइसचं लोकेशन आणि तिथपर्यंत जायच्या दिशा मिळतील. या पद्धतीने तुम्ही आयफोन, आयपॅड, मॅक, अॅपल वॉच अशी अॅपलची जवळपास सर्व डिव्हायसेस (Find lost Apple devices) शोधू शकता. विशेष म्हणजे, तुम्ही तुमच्या डिव्हाइसमध्ये एखादं म्युझिक वाजवू शकता किंवा त्यातून तुमच्यासाठी दिशेची माहितीदेखील मागू शकता. तुम्ही ते डिव्हाइस रिकव्हर करू शकत नसलात, तर त्याला ‘मार्क अॅज लॉस्ट’ करणं किंवा त्यातली माहिती डिलीट करणं या सुविधाही अॅपलचं ‘फाइंड माय युटिलिटी’ देतं.
आयफोनचं ‘अॅक्टिव्हेशन लॉक’
आयफोनचं अॅक्टिव्हेशन लॉक अॅपलच्या सर्व स्मार्टफोन्समध्ये बाय डिफॉल्ट असतं. कोणी तुमच्या आयफोनचं फाइंड माय आयफोन फीचर बंद करण्याचा, त्यातली माहिती डिलीट करण्याचा वा तो आयफोन रिअॅक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यासाठी आधी तुमचा अॅपल आयडी आणि पासवर्ड इनपुट करणं गरजेचं आहे. ही माहिती अर्थातच तुमचा फोन चोरणाऱ्या व्यक्तीकडे नसल्यामुळे तुमचा फोन सुरक्षित राहतो.
सॅमसंगचा फाइंड माय मोबाइल ऑप्शन
काही सॅमसंग स्मार्टफोन्स फाइंड माय मोबाइल या सुविधेसह (Find my mobile) येतात. यासाठी तुम्हाला सर्वांत आधी सेटिंग्जमध्ये जावं लागेल. त्यानंतर बायोमेट्रिक्स अँड सिक्युरिटी हा पर्याय निवडा. यामध्ये फाइंड माय मोबाइल हा पर्याय दिसेल, तो ऑन करा. यानंतर तुम्हाला आवश्यक ती माहिती भरून सॅमसंग अकाउंट (Find my Samsung smartphone) क्रिएट करावं लागेल. यानंतर मग तुम्ही रिमोट अनलॉक, सेंड लास्ट लोकेशन आणि ऑफलाइन फाइंडिंग असे पर्याय निवडू शकता. याच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन लोकेट किंवा लॉक करू शकता. अगदी गरज पडल्यास तुम्ही त्यातली माहिती डिलीट करू शकता.
साध्या फोनचं काय कराल?
साध्या मोबाइल फोनमध्ये ना कोणतं अॅप असतं, ना इंटरनेट. मग तुमचा असा फोन हरवला तर तुमच्याकडे काय पर्याय असू शकतात? उत्तर सोपं आहे. तुमच्या ओल्डस्कूल फोनसाठी शोधण्याच्या पद्धतीही ओल्डस्कूलच वापराव्या लागतील. तुमचा साधा मोबाइल फोन (How to find lost feature phone) हरवल्यास दुसऱ्या एखाद्या मोबाइलवरून त्यावर कॉल करा. व्हायब्रेशन वा रिंगचा आवाज कुठून येतोय याचा अंदाज घ्या. तुमचा फोन एखाद्या व्यक्तीला सापडला असेल (आणि तो फोन परत देण्याची त्या व्यक्तीची इच्छा असेल) तर ती व्यक्ती तुमचा फोन उचलेलच. दुसरा एक पर्याय म्हणजे, तुम्ही दिवसभरात कुठे कुठे गेला होतात ते आठवून त्या ठिकाणी तुमचा फोन शोधा.
आणखी एक पर्याय म्हणजे, तुमच्या सिमकार्ड सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीला कॉल करून, तुमच्या मोबाइलचं लोकेशन मागणं. त्यांनी ती माहिती दिली, तर चांगलंच आहे. अन्यथा तुम्ही त्या सिमची सेवा बंद करण्याची विनंती करू शकता. त्यामुळे तुमच्या मोबाइल नंबरचा गैरवापर टाळता येईल. तुमच्या फोनचा आयएमईआय नंबर तुम्हाला माहिती असेल, तर तुम्ही ‘इम्मोबिलाइझ’ (Immobilize) या वेबसाइटवर तुमचा फोन रजिस्टर करू शकता. भविष्यात तुमचा मोबाइल हरवू नये, यासाठी तुम्ही ‘अॅक्युट्रॅकिंग’ (AccuTracking) वेबसाइटवर तुमचा साधा मोबाइल रजिस्टर करून ट्रॅकिंग सर्व्हिस घेऊ शकता.
कोणाला तुमचा मोबाइल सापडल्यास काय कराल?
एखाद्या व्यक्तीला तुमचा मोबाइल सापडल्यास त्या व्यक्तीशी बोलताना खबरदारी बाळगा. स्वतःबद्दलची खासगी माहिती उघड करू नका. विशेष म्हणजे जोपर्यंत तुम्हाला त्या व्यक्तीवर विश्वास बसत नाही, तोपर्यंत तुमच्या घराचा पत्ता त्या व्यक्तीला देऊ नका. मोबाइल परत घेण्यासाठी शक्यतो बाहेरच कुठे तरी भेटण्याचा प्रयत्न करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone