फिशिंग ईमेल (Phishing Email) एक फ्रॉड ई-मेल मेसेज आहे. फिशिंग मेल अगदी खऱ्या मेलप्रमाणे दिसतात. त्यामुळे असे मेल एखाद्या कंपनीनेच पाठवले आहेत असंच वाटू शकतं.
फिशिंग ई-मेलमधून युजरकडे त्यांचे पर्सनल डिटेल्स, फायनेंशिअल माहिती मागितली जाते. अशा ई-मेलवर तुमची माहिती गेल्यास, आर्थिक नुकसानासह इतरही डेटा चोरीसारखा धोकाही निर्माण होऊ शकतो.
Phishing Email ओळखणं अतिशय गरजेचं आहे. फिशिंग ई-मेल चुकीच्या पद्धतीने लिहिलेले असतात. त्यात व्याकरणाच्या चुका, चुकीच्या स्पेलिंग, लोगोमध्ये काही बदल केलेले असतात.
फिशिंग करणारे स्कॅमर्स प्रसिद्ध कंपन्यांच्या लोगोप्रमाणेच दिसणारे लोगो तयार करतात. पण यात स्पेलिंग किंवा लोगोमध्ये काहीशी फेरफार केलेली असते. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष दिल्यास फिशिंग मेल ओळखता येईल.
हे बनावट ईमेल एका लिंकशी जोडलेले असतात. युजरने त्यावर क्लिक केल्यास पुढे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. तसंच बनावट ईमेलमध्ये खऱ्या कंपनीचे URL मॅच करत नाहीत. त्यामुळे कोणत्याही अनोळखी मेलमध्ये आलेल्या लिंकवर शहानिशा केल्याशिवाय क्लिक करू नका.