अधिकतर लोक पासवर्ड (Password) लक्षात राहण्यासाठी अतिशय सोप्या पासवर्डचा वापर करतात, पण लक्षात राहण्यासाठी अतिशय सोपा ठेवलेला पासवर्ड सहजपणे क्रॅकही केला जातो. त्यामुळे तुमचं अकाउंट हॅक होण्याची भीती असते.
पासवर्डसाठी किमान 10 ते 15 अक्षरांचा वापर करा. यात अक्षरांसह अंकांचाही समावेश असावा. तसंच स्पेशल कॅरॅक्टर्स @,#,%,&,* यांचा देखील वापर करावा.
सोप्या शब्दांचा पासवर्ड नसावा. पासवर्ड हा 8 पेक्षा कमी अक्षरांचा नसावा. पासवर्डमध्ये तुमचे नाव, जन्मतारीख याचा वापर करु नका. युजर नेम हाच पासवर्ड नसावा.
ऑनलाइन अकाउंट्सच्या बाबतीत टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा (two-factor authentication) वापर करावा. याद्वारे आपण अनेक प्रकारे सुरक्षित राहू शकतो.
123456 आणि 123456789, 123, omgpop, 123321, 654321 आणि qwertyuiop, picture1, password आणि 12345678 पासवर्डही सर्वाधिक कॉमन आहेत. अशा कमकुवत, सोप्या पासवर्डमुळे कोणताही युजर सहजपणे हॅकिंगचा बळी ठरू शकतो. यापैकी कोणता पासवर्ड ठेवला असेल, तर तो त्वरित बदलण्याची गरज आहे.