मागील अनेक दिवसांत अनेकांच्या पॅन कार्डचा चुकीचा वापर केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. केवळ सर्वसामान्यच नाही, तर बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी, बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव यांच्या पॅन कार्डचाही चुकीचा वापर केला गेला होता. त्यामुळे सुरक्षिततेसाठी पॅन कार्ड हिस्ट्री तपासता येते.
आता तुमचा मोबाइल नंबर, जन्मतारीख आणि ईमेल आयडी अशी माहिती भरा. त्यानंतर लॉगइनसाठी पासवर्ड तयार करा. त्यानंतर Income Tax ID ची निवड करा.
आता पॅन कार्ड नंबर टाका आणि Verify Your Identity पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर काही आवश्यक माहिती भरा आणि फी भरुन अकाउंट लॉगइन करा.
जर तुमच्या पॅन कार्डचा चुकीचा वापर झाला असेल, तर तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर तक्रार दाखल करू शकता.