मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Gmail मध्ये Spam मेल्स डिलिट करून वैतागला आहात? या टिप्स वाचवतील तुमचा वेळ

Gmail मध्ये Spam मेल्स डिलिट करून वैतागला आहात? या टिप्स वाचवतील तुमचा वेळ

स्पॅम मेल्स म्हणजेच असे काही मेल्स ज्याचा अनेकवेळा आपल्याला उपयोगच नसतो. अशावेळी हे डिलीट करण्याचा मोठा ताप होतो. यावर आता एक उपाय आहे.

स्पॅम मेल्स म्हणजेच असे काही मेल्स ज्याचा अनेकवेळा आपल्याला उपयोगच नसतो. अशावेळी हे डिलीट करण्याचा मोठा ताप होतो. यावर आता एक उपाय आहे.

स्पॅम मेल्स म्हणजेच असे काही मेल्स ज्याचा अनेकवेळा आपल्याला उपयोगच नसतो. अशावेळी हे डिलीट करण्याचा मोठा ताप होतो. यावर आता एक उपाय आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 12 सप्टेंबर : सध्याच्या कम्युनिकेशनच्या जगात सोशल मीडिया अ‍ॅप्सच्या वापराबरोबरच तुमचा अधिकृत मेल आयडी असणं अतिशय गरजेचं आहे. विविध कंपन्या अगदी दररोज आपल्याला मेल्स पाठवतात. ज्यांचा उपयोग कमी आणि उपद्रव जास्त अशा मेल्सना स्पॅम मेल्स म्हणतात. हे निरूपयोगी मेल्स डिलिट करणं हे कामच होऊन बसतं. म्हणूनच स्पॅम मेल्सचा त्रास टाळण्यासाठी काही सोप्या टिप्सची माहिती करून घेऊयात.

    स्पॅम मेल्स म्हणजेच असे काही मेल्स ज्याचा अनेकवेळा आपल्याला उपयोगच नसतो. या मेल्समध्ये काही फसवणूक (Fraud), घोटाळे (Scam) आणि आर्थिक गैरव्यवहार (Financial fishing) यांच्याशी संबंधित मेल्स असण्याची शक्यता असते.

    असे ओळखा स्पॅम मेल

    आपल्या जी-मेल अकाउंटमध्ये लॉग इन केल्यावर वर दिलेल्या सर्च बॉक्सवर क्लिक करा. मग सगळ्या प्रमोशनल मेल्स म्हणजेच कंपनीची जाहिरातबाजी करणार्‍या मेल्सची लिस्ट जाणून घेण्यासाठी अनसबस्क्राईब असं टाईप करा आणि मग हे सगळ्या मेल्सच्या आधी दिलेल्या चेकबॉक्सवर क्लिक करून ते सिलेक्ट करा. हे करताना या मेल्समध्ये तुमच्या कामाचा, महत्त्वाचा, ऑफिसचा एखादा मेल नाही ना याची काळजी घ्या. एकदा का सगळे स्पॅम मेल्स (Spam Mail) सिलेक्ट केलेत की वर दिलेल्या तीन डॉटस वर क्लिक करून फिल्टर मेसेजेस लाईक दिज हा पर्याय निवडा.

    वाचा - तुम्हीही Truecaller अ‍ॅप वापरता का? डेटा सुरक्षिततेबाबत कंपनीने काय सांगितलं...

    हे झाल्यावर क्रिएट फिल्टर हा पर्याय निवडून स्पॅम मेल्स कायमचे डिलिट करणं सोपं होतं. आपला वेळ वाचवायचा असेल आणि असे मेल्स आपोआप डिलिट करायचे असल्यास क्रिएट अ फिल्टर (Create a Filter) वर क्लिक करा; आणि मग डिलिटचा पर्याय निवडा. हे झाल्यावर आपल्याला एक पॉप-अप दिसतो, जेणेकरून आपल्याला हे समजतं की फिल्टर क्रिएट झालेला आहे. इतकंच नाही तर डिलिट करण्यापेक्षा अशा निरूपयोगी स्पॅम मेल्सवर तुम्ही लेबल म्हणजे त्यासाठी एखादी विशिष्ट खूणही ठरवू शकता जेणेकरून स्पॅम मेल्स शोधण्याचं काम आणि पर्यायने वेळ वाचेल.

    एका तात्पुरत्या मेल आयडीचा वापर

    आपण इंटरनेट सर्फिंग करताना विविध साईटसवर आपला मेल आयडी देतो. अनेकवेळा ऑनलाईन शॉपिंगच्या वेळेस मेलआयडी मागितला जातोच. त्यावेळेस मेल आयडी देणं भागच होतं. अशा वेळेस आपला कामाशी निगडित असलेला मेल आयडी देऊ नये. कारण जेव्हा इंटरनेटवर ऑनलाईन असताना मेल आयडी देतो, तेव्हा तो आणखी अनेक थर्ड पार्टी वेबसाईट्सकडेही सहज पोहोचतो. ज्यामुळे स्पॅम मेल्सचा आपल्यवर भडिमार व्हायला सुरूवात होते. अनेकवेळा हे स्पॅम मेल्स हे अतिशय खात्रीशीर वाटतात आणि ह्याच वेळेस कुणी फसवणुकीला बळी पडतो. यासाठीच आपला प्रायमरी मेल आयडी न देता कोणताही तात्पुरता मेल आयडी देणं उपयुक्त ठरतं. temp-mail.org या वेबसाईटवरून तुम्ही तुमचा तात्पुरता मेल आयडी विनाशुल्क (Free of Cost) तयार करू शकता. अशा स्वरूपाचा टेंपररी मेल आयडी कोणत्याही वेबसाईटवरून बनवू शकता.

    स्पॅम मेल्स अनसबस्क्राईब करा

    आपल्या जी-मेल आयडीला लॉग इन केल्यावर स्पॅम मेल्सच्या फोल्डरवर क्लिक करा आणि जे मेल्स तुम्हाला नकोयत किंवा अनसबस्क्राईब करायचे आहेत, ते सगळे मेल्स सिलेक्ट करा. यानंतर वर दिलेल्या ‘i’ आयकनवर क्लिक करा. हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला रिपोर्ट स्पॅम (Report Spam) किंवा रिपोर्ट स्पॅम अँड अनसबस्क्राईब हे पर्याय दिसतील. जे मेल्स कायमचे डिलिट करायचेत ते पुन्हा एकदा तपासून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून एखादा कामाचा किंवा महत्त्वाचा मेल डिलिट होणार नाही याची खबरदारी घेता येईल. यानंतर मात्र रिपोर्ट स्पॅम अँड अनसबस्क्राईब हा पर्याय निवडावा. भविष्यात पुन्हा कधीही तुम्हाला या स्पॅम मेल्सच्या फोल्डरमध्ये कोणताच मेल येणार नाही आणि तुमचा वेळ ही वाचेल.

    जी-मेल ही अशी सेवा आहे की आपण सगळेच त्याचा वापर करतो. जी-मेल त्याच्या ग्राहकांच्या सोयीच्या खूप सुविधाही पुरवतं. मेलबॉक्समधील अनावश्यक मेल्स काढून टाकण्यासाठी काही युक्त्या वापरल्या तर ते अकाउंट कमी जागा व्यापेल आणि सेवा उत्तम मिळत राहील.

    First published:
    top videos

      Tags: Gmail, Technology