नवी दिल्ली 01 फेब्रुवारी : वेगवेगळ्या परिस्थितीत जास्तीत जास्त लोकांना पेटीएम (Paytm) वापरता यावं आणि हे अॅप वापरताना युजर्सना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी पेटीएम (Paytm) आपल्या सेवांमध्ये सुधारणा करत राहातं. नुकतंच पेटीएमने युजर्ससाठी 'टॅप टू पे' (Tap to Pay) फीचर सादर करण्याची घोषणा केली होती. हे फिचर मोबाईल फोन फक्त PoS मशीनवर (PoS machine) टॅप करून अत्यंत वेगाने पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करण्याचे व्यवहार करतं.
NFC द्वारे पेमेंट करणारी पेटीएम सर्व्हिस (Paytm Service) इंटरनेट कनेक्शन (Internet Connection) नसतानाही काम करू शकते. परंतु, ही सर्व्हिस सध्या फक्त Android युजर्ससाठी उपलब्ध आहे. iOS युजर्स ही सर्व्हिस वापरू शकत नाहीत, कारण आयफोन युजर्ससाठी (iPhone users) NFC- सपोर्टेड 'टॅप टू पे' फिचर केवळ Apple Pay द्वारे अॅक्सेसेबल असून ते सध्या भारतात उपलब्ध नाही. म्हणून, जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल आणि तुमच्या फोनवर टॅप टू पे फीचर सुरू करण्याची तुमची इच्छा असेल तर या सोप्या स्टेप्स फॉलो करा.
Google Chrome चा वापर करता? मग यामुळे होणारं नुकसानही जाणून घ्याच
1: पेटीएम अॅप उघडा. अॅप अपडेट केलंय, याची खात्री करा. नसल्यास, Google Play Store ला भेट द्या आणि अॅप अपडेट करा.
2: अॅप ओपन केल्यानंतर, Tap to Pay या पर्यायावर क्लिक करा.
3: आता, तुमच्याकडे आधीच सेव्ह केलेले कार्ड नसल्यास स्क्रीनच्या खाली add new card वर क्लिक करा. तुमच्याकडे सेव्ह केलेलं कार्ड असेल तर ही स्टेप फॉलो करण्याची गरज नाही.
4: तुम्हाला हे फिचर अॅक्टिव्हेट करायचे असलेले कार्ड निवडा आणि Proceed to Verify Card या ऑप्शनवर टॅप करा.
5: त्यानंतर तुम्हाला वन टाइम पासवर्ड (OTP) मिळेल. ते एंटर करा आणि अशाप्रकारे तुमचे Tap To Pay फिचर अॅक्टिव्हेट केले जाईल.
6: टॅप टू पे फीचर वापरत असताना, तुमच्या फोनवर NFC चालू असल्याची खात्री करा. हे फिचर वापरून तुम्ही जास्तीत जास्त 5,000 रुपये पे करू शकता. जर तुम्हाला 5000 रुपयांपेक्षा जास्त पैसे पाठवायचे असतील तर तुम्हाला PoS मशीनवर पिन (PIN) टाकावा लागेल.
हे फिचर डेव्हलप करण्यासाठी वापरल्या जाणार्या टेक्नोलॉजीमध्ये 16-अंकी पॅन नंबर (PAN) डिजिटल ट्रान्जॅक्शन कोडमध्ये (Digital Transaction Code) रूपांतरित करणं समाविष्ट आहे. हा कोड युजरला कार्डचे कोणतेही डिटेल्स PoS मशीनवर शेअर न करता पैसे भरण्याची परवानगी देतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Paytm Money, Paytm offers