मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आता सिम कार्डशिवाय करता येणार फोन-मेसेज, घरबसल्या असं अ‍ॅक्टिव्हेट करा ई-सिम

आता सिम कार्डशिवाय करता येणार फोन-मेसेज, घरबसल्या असं अ‍ॅक्टिव्हेट करा ई-सिम

जर तुम्हाला तुमचे फिजिकल सिम ई-सिममध्ये बदलायचे असेल, तर आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगणार आहोत.

जर तुम्हाला तुमचे फिजिकल सिम ई-सिममध्ये बदलायचे असेल, तर आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगणार आहोत.

जर तुम्हाला तुमचे फिजिकल सिम ई-सिममध्ये बदलायचे असेल, तर आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगणार आहोत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई 18 मार्च : आधीच्या रेग्युलेट सिमची जागा आता ई-सिमने घेतली आहे. अनेक फोनमध्ये ई-सिमचा ऑप्शन देण्यात आलं आहे, त्यामुळे भारतात eSIM मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. भारतात रेग्युलर सिम कार्डच्या तुलनेत eSIM वापरण्याचे अनेक फायदे आहेत. यासाठी तुम्हाला फिजिकल सिमची गरज नाही तसेच ते फोनमध्येच एम्बेड केले जाते. ई-सिमला एम्बेडेड सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्युल असं म्हणतात.

    या संदर्भात 'नवभारत टाइम्स'ने वृत्त दिलं आहे. Airtel, Jio आणि Vi आपल्या देशातील तीन प्रमुख ऑपरेटर आहेत. ते ग्राहकाला भारतात फिजिकल सिम eSIM मध्ये बदलण्याची सुविधा देतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे eSIM फक्त eSIM चा ऑप्शन असलेल्या फोनमध्ये वापरले जाऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे फिजिकल सिम ई-सिममध्ये बदलायचे असेल, तर आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगणार आहोत. आज आपण टेलिकॉम ऑपरेटर जिओचं सिम ई-सिममध्ये कसं कन्व्हर्ट करायचं, ते जाणून घेऊयात.

    फोन केव्हा चार्ज करावा 10, 20 की 45 टक्के? चांगल्या बॅटरी लाईफसाठी काय चांगलं?

    - सर्वांत आधी तुमचे डिव्हाइस जिओ eSIM शी कम्पॅटिबल असल्याची खात्री करा. तुम्ही जिओच्या अधिकृत वेबसाइटवरूनही हे तपासू शकता.

    - त्यानंतर सेटिंग ओपन करा आणि नंतर तुमचा IMEI व EID नंबर तपासण्यासाठी About वर क्लिक करा.

    - त्यानंतर आता अ‍ॅक्टिव्ह जिओ सिम असलेल्या अँड्रॉइड फोनमधून GETESIM 32 अंकांचा 15 अंकांचा EID IMEI 199 या नंबरवर एसएमएस पाठवा.

    - तुम्हाला 19 अंकांचा eSIM नंबर व तुमचे eSIM प्रोफाइल कॉन्फिगरेशन डिटेल्स प्राप्त होतील.

    - त्यानंतर पुन्हा तुम्हाला 199 नंबरवर एक एसएमएस पाठवावा लागेल. SIMCHG व eSIM नंबर हा मेसेज पाठवा.

    - त्यानंतर दोन तासांनी तुम्हाला eSIM प्रोसेसिंगबद्दल अपडेट मिळेल.

    - मेसेज मिळाल्यावर 183 वर '1' पाठवून याची खातरजमा करा.

    - त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिओ नंबरवर एक फोन येईल, ते तुम्हाला 19 अंकांचा eSIM नंबर शेअर करण्यास सांगतील.

    - त्यानंतर लगेच तुम्हाला पुन्हा एकदा ई-सिमची खात्री करण्यासाठी कन्फर्मेशन मेसेज येईल.

    ई-सिम फिजिकल सिमप्रमाणेच 4G, 5G सारख्या नेटवर्कला सपोर्ट करते. ही सेवा वापरण्यासाठी मोबाइल फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हीही अगदी सोप्या पद्धतीने तुमचे साधे सिम ई-सिममध्ये कन्व्हर्ट करून घेऊ शकता.

    First published:

    Tags: Mobile Phone, Sim