नवी दिल्ली, 17 जानेवारी : जर बजेटमध्ये बाईक किंवा स्कूटर खरेदी करायची असल्यास, सेकंड हँड बाईक किंवा स्कूटरचा चांगला पर्याय आहे. सेकंड हँड बाईक किंवा स्कूटर चांगल्या स्थितीत नसल्याचं अनेकांचं म्हणण असतं. परंतु योग्यरित्या पडताळणी करून, चांगली बाईक-स्कूटर खरेदी करता येऊ शकते.
चांगल्या सेकंड हँड बाईक-स्कूटर कशा पाहायच्या किंवा शोधायच्या असा अनेकांचा प्रश्न असतो. पण आता चांगल्या सेकंड हँड बाईक-स्कूटर खरेदी करण्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध आहे. कमर्शियल शॉपिंग साईट https://www.cars24.com/bike/buy-used-bikes-new-delhi/ द्वारे चांगल्या बाईक-स्कूटर खरेदी करू शकतात. कंपनीच्या या वेबसाईटवर वेगवेगळ्या कंपनीच्या बाईक आणि स्कूटर ऑफरसह पाहायला मिळतील. त्याबाबत cars24.com वर अधिक माहिती घेता येईल.
Bajaj Avenger -
cars24.com वर या बाईकचं 2014 चं मॉडेल आहे. ही बाईक 38 हजार रुपयांत खरेदी करता येईल. तसंच बाईक 13,948 किलोमीटर चालली आहे आणि इंश्योरन्स 2016-17 मध्ये Expiry झाला आहे. बाईक मालकाकडे याची ओरिजनल आरसीदेखील आहे.
Honda Dream Yuga -
हे या गाडीचं 2017 चं मॉडेल आहे. ही बाईक 37 हजारांत खरेदी करता येईल. गाडी एकूण 39,949 किलोमीटर चालली आहे. गाडीचा इंश्योरन्स आणि आरसी वाहन चालकाकडे आहे.
TVS Jupiter -
cars24.com वर या स्कूटरचं 2016 चं मॉडेल आहे. ही स्कूटर 39,941 किलोमीटर चालली असून, ती 41 हजारात खरेदी करता येईल. स्कूटरचा इंश्योरन्स वॅलिड असून आरसी वाहन चालकाकडे आहे.
Hero Splendor iSmart -
या बाईकचं 2016 चं मॉडेल cars24.com वर उपलब्ध आहे. 31 हजारात ही बाईक खरेदी करता येईल. cars24.com वर असलेली Hero Splendor iSmart बाईक एकूण 15,472 किलोमीटर चालली असून आरसी वाहन चालकाकडे आहे.
या टू-व्हिलरव्यतिरिक्त cars24.com अजूनही अनेक बेस्ट ऑफर्स मिळू शकतात. तसंच इतरही अनेक बाईक-स्कूटर पाहता येतील. परंतु गाडी घेताना त्याची संपूर्ण तपासणी, पडताळणी करून घ्यावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.