मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

उन्हात बाईक चालवणं होणार सुसह्य, हेल्मेटला ‘कूल’ करणाऱ्या गॅझेटची बाजारात एंट्री

उन्हात बाईक चालवणं होणार सुसह्य, हेल्मेटला ‘कूल’ करणाऱ्या गॅझेटची बाजारात एंट्री

Bluarmor Helmet AC: उन्हाळ्यात दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे हे मोठे आव्हान आहे. वाढत्या तापमानामुळे डोकं दुखण्याची समस्या निर्माण होते. पण, आता बाजारात असे उत्पादन आले आहे जे तुमचे हेल्मेट 15 अंश सेल्सिअस पर्यंत थंड करू शकते. जाणून घेऊया त्याच्या खास गोष्टी.

पुढे वाचा ...
मुंबई, 13 मे : उन्हाचा (Summer) कडाका वाढतो आहे. यंदा तर एप्रिल महिन्यातच पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला होता. आतापर्यंत उष्माघातानं (Sun Stroke) प्राण गमावलेल्यांची संख्याही मोठी आहे. अशा उन्हात शक्यतो बाहेर पडू नका असा सल्ला दिला जातो, पण कामाच्या मंडळींनी काय करायचं? त्यासाठी बाहेर फिरणं क्रमप्राप्तच असतं. त्यातही बाईक किंवा टू-व्हीलरवरून (Two-Wheelar) फिरणारे, पादचारी यांची अवस्था तर विचारूच नका. सिग्नलवर एक मिनिट थांबलं, तरी उन्हाचा चटका बसतो. त्यात डोक्यावर हेल्मेट घातलं, तरी उकाड्यानं जीव हैराण होतो आणि नाही घालावं, तर सुरक्षेचा प्रश्न असतो. या द्विधेवर उपाय ठरेल असं एक गॅझेट बाजारात आलं आहे. हे गॅझेट हेल्मेटवर लावलं, तर त्यामुळे हेल्मेटमधील (Helmet) तापमान कमी होऊन डोक्याला थंडावा मिळू शकतो. आज तक वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या गॅझेटमुळे तापमान 15 अंशांपर्यंत कमी करता येतं. या गॅझेटबद्दल आपण जाणून घेऊया. ब्लूआर्मर (BluArmor) नावाची कंपनी हेल्मेटसाठी कूलर (Cooling Device) बनवण्याचं काम करते. कंपनीनं सध्या बाजारात तीन प्रकारची गॅझेट्स आणली आहेत. BluSnap2, BLU3 A10, आणि BLU3 E20 ही ती तीन उत्पादनं आहेत. ही गॅझेट्स पूर्ण डोकं झाकणाऱ्या हेल्मेटला लावता येतात. याच्या माध्यमातून थंड, धूळविरहीत आणि स्वच्छ हवा मिळेल, असा कंपनीचा दावा आहे. ऑनलाइन फसवणूक झाल्यास रिफंड मिळण्यासाठी लगेच करा हे एक काम, अन्यथा... उन्हाच्या काहिलीत अशाप्रकारे थंडावा देणारी उत्पादनं कोणाला नको असतात? ग्राहकांची हिच गरज ओळखून खास उन्हाळ्यासाठी कंपनीनं ही उत्पादनं बाजारात आणली आहेत. या तिन्ही उत्पादनांच्या वापरामुळे हेल्मेटमधील तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत कमी करता येतं, असा कंपनीचा दावा आहे. BluSnap2 हे यातील बेसिक मॉडेल आहे. त्याची किंमत 1299 रुपये इतकी असून, त्याचं वजन 250 ग्रॅम आहे. यात आणखी 1 एक्स एअरफ्लो ग्राहकांना मिळणार आहे. BLU3 A10 या दुसऱ्या मॉडेलची किंमत 2,299 रुपये आहे. यात 2 एक्स एअरफ्लो आहे, तर याचं वजन 260 ग्रॅम आहे. या मॉडेलमध्येही 15 अंशांपर्यंत तापमान कमी करण्याची क्षमता आहे. त्याशिवाय यात पंख्याची (Cooling Fan) गती कमी जास्त करण्यासाठी तीन कंट्रोल दिलेले आहेत. मात्र, यात कोणतंही कनेक्टिव्हीटी फीचर देण्यात आलेलं नाही. तिसऱ्या म्हणजेच BLU3 E20 या मॉडेलमध्ये हे कनेक्टिव्हीटी फीचर आहे. त्याशिवाय आधीच्या मॉडेलमधील 2 एक्स एअरफ्लो आणि पंख्याची गती कमी जास्त करणारे तीन कंट्रोल याही मॉडेलमध्ये आहेत. कनेक्टिव्हीटी (Connectivity) फीचरमुळे म्युझिक, कॉल नॅव्हिगेशन आणि व्हॉट्सअ‍ॅप यात वापरू शकता. हेल्मेटला कूलर बनवणारी ही उत्पादनं वापरण्यासाठी अ‍ॅपचा वापर करावा लागेल. शिवाय व्हॉईस असिस्ट्ंसच्या माध्यमातूनही हे वापरता येऊ शकेल. कंपनीच्या बेवसाईटवरून ही उत्पादनं खरेदी करता येऊ शकतात. त्याशिवाय सध्या समर सेल (Summer Sale) कोड वापरून त्यांच्या किंमतीत सूटही मिळवता येईल. आता उन्हाळा वाढला, तरी चिंता करण्याचं कारण नाही. तुमच्या हेल्मेटला कुलिंग गॅझेट लावून कुठेही व कितीही वेळ फिरण्याची मजा घेता येईल.
First published:

Tags: Bike riding

पुढील बातम्या