मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /लाइफ @25: तुमच्या Laptop मध्ये हार्ड डिस्क की SSD? याचं महत्त्व तुम्हाला माहितीय का?

लाइफ @25: तुमच्या Laptop मध्ये हार्ड डिस्क की SSD? याचं महत्त्व तुम्हाला माहितीय का?

तुमच्या Laptop मध्ये हार्ड डिस्क की SSD? याचं महत्त्व तुम्हाला माहितीय का?

तुमच्या Laptop मध्ये हार्ड डिस्क की SSD? याचं महत्त्व तुम्हाला माहितीय का?

तुमच्या Laptop मध्ये हार्ड डिस्क की SSD? याचं महत्त्व तुम्हाला माहितीय का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 2 सप्टेंबर : लॅपटॉप घेताना किंवा तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल तर त्यामध्ये SSD आहे का? असा प्रश्न विचारण्यामागे एका खास कारण आहे. बऱ्याच जणांना SSD आपल्या लॅपटॉपमध्ये का असावी याचं कारण अजूनही माहिती नाही. आपण डोळे झाकून दोन हार्ड डिस्कचा लॅपटॉप घेतो. पण तुम्हाला लॅपटॉपला SSD नसेल तर तुम्ही एवढे पैसे खर्च करून मग काय उपयोग असंही होतं. तर याचं महत्त्व आज तुम्हाला सांगणार आहोत.

SSD हे देखील एक प्रकारचं हार्ड डिस्कच आहे. हे हार्ड डिस्कपेक्षा वेगानं काम करतं. हार्ड डिस्कमध्येही दोन प्रकार आहेत. एक हार्ड डिस्क ड्राईव्ह आणि दुसरा सॉलिड डिस्क ड्राईव्ह ज्याला आपण SSD म्हणून ओळखतो. HDD चा उपयोग जवळपास सगळ्याच लॅपटॉप आणि कंप्यूटरमध्ये होतो. मात्र सगळ्या डिव्हाइसला SSD असेलच असं नाही.

SSD ची छोटी हार्ड डिस्क असते जी आपल्या लॅपटॉपमध्ये असेल तर तो वेगाने काम करतो. डेटा ट्रान्सफरचा स्पीडही जास्त असतो. त्यामुळे जास्त लॅपटॉपची काम करण्याची कपॅसिटी वाढते.

चुकून जर लॅपटॉप खाली पडला किंवा त्याला लागलं तर SSD तुमच्या लॅपटॉपला तुटण्यापासून वाचवू शकतो. स्पीड जास्त असल्याने बूट, रिस्टार्ट किंवा लॅपटॉप सारखा हँग होण्याची समस्या निर्माण होत नाही. स्पीडने कामं होतं.

ही खूप हलकी असल्याने कुठेही घेऊन जाता येऊ शकते. दोन HDD असतील तर त्यापैकी एका जागी SSD बसवता येऊ शकते. ती लवकर खराब होत नाही त्यामुळे तुमचा डेटाही सुरक्षित राहातो. HDD लवकर खराब होते त्यामुळे डेटाही जाण्याचा धोका असतो. SSD इन्स्टॉल करणं खूप सोपं असतं.

स्पीड, बुटिंगसाठी लागणारा वेळ कमी होणं, कमी जागा, कमी वीज अशा अनेक गोष्टी तुम्हाला एका SSD मध्ये मिळतात. त्यामुळे तुमचा लॅपटॉप सुपरफास्ट चालतो. याची किंमत जास्त असते. त्यामुळे लोक हे खरेदी करण्यासाठी थोडा हात आखडतात. पण आपल्या लॅपटॉपला 2 HDD घेण्यापेक्षा एक SSD घेणं केव्हाही फायद्याचंच आहे.

First published:
top videos

    Tags: Tech news