जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आता तुमचे आवडचे अॅप्स Zomato आणि Swiggy होणार बॅन? गुगल प्ले स्टोअरनं पाठवली नोटीस

आता तुमचे आवडचे अॅप्स Zomato आणि Swiggy होणार बॅन? गुगल प्ले स्टोअरनं पाठवली नोटीस

आता तुमचे आवडचे अॅप्स Zomato आणि Swiggy होणार बॅन? गुगल प्ले स्टोअरनं पाठवली नोटीस

या दोन्ही अॅप्सना गुगलकडून प्ले स्टोअर नियमांचे उल्लंघन केल्याची नोटीस मिळाली आहे. दोन्ही अ‍ॅप्सना त्यांच्या अ‍ॅपमध्ये खेळाचे फिचर जोडल्यामुळे ही नोटीस मिळाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर : प्रत्येकाच्या फोनमध्ये हसखास असणारे आणि घरात फूड डिलिव्हरी करणारे Zomato आणि Swiggy अॅप्सच्या अडचणी वाढल्या आहेत. या दोन्ही अॅप्सना गुगलकडून प्ले स्टोअर नियमांचे उल्लंघन केल्याची नोटीस मिळाली आहे. दोन्ही अ‍ॅप्सना त्यांच्या अ‍ॅपमध्ये खेळाचे फिचर जोडल्यामुळे ही नोटीस मिळाली आहे. Zomato आणि Swiggy आधी 18 सप्टेंबर रोजी गुगलनं डिजिटल पेमेंट कंपनी Paytm ला प्ले स्टोअरवरून हटवले होते. गुगलने पेटीएमवर स्पोर्ट्स बेटिंग पॉलिसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. मात्र Paytm app काही तासांनंतर पुन्हा प्ले स्टोअरवर आले. वाचा- बिलं भरणारी अ‍ॅप सुरक्षित आहेत का? ऑनलाइन पेमेंट करताना घ्या ही काळजी Zomatoने नोटीस मिळाल्याचे मान्य केले आहे. मात्र त्यांनी यास ‘अन्यायकारक’ असे वर्णन केले. Zomatoच्या प्रवक्त्याने सांगितले की, “हो, आम्हाला Google कडून एक सूचना प्राप्त झाली आहे. आम्हाला विश्वास आहे की ही अयोग्य सूचना आहे, मात्र आम्ही एक छोटी कंपनी आहोत आणि आम्ही Google च्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने आमची व्यवसाय रणनीती तयार केली आहे”. Zomato आयपीएलच्या पार्श्वभुमीवर ‘जोमाटो प्रीमियर लीग’चे आयोजन करणार आहे. वाचा- Paytm युझर्ससाठी मोठी बातमी; IPL स्कीममुळे Google पुन्हा ban करणार का App? मात्र Swiggy अॅपनं अद्याप याबाबत माहिती दिली नाही. मात्र कंपनीने आपले स्पोर्ट्स फिचर थांबवले आहे. या विषयावर दोन्ही अॅप्स Google शी बोलत आहे. गुगलने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. बर्‍याच कंपन्यांना सध्याच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संधीचे भांडवल करायचे आहे. अशा परिस्थितीत, ती ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि विक्री वाढविण्यासाठी अ‍ॅपमध्ये गेम्स फिचर जोडत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: swiggy , Zomato
  • First Published :
जाहिरात
जाहिरात