मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google ने Play Store वरून 6 धोकादायक अँटीव्हायरस अ‍ॅप्सना हटवलं; यूजर्सचे लॉगिन डिटेल्सची चोरी करायचे

Google ने Play Store वरून 6 धोकादायक अँटीव्हायरस अ‍ॅप्सना हटवलं; यूजर्सचे लॉगिन डिटेल्सची चोरी करायचे

गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून काही शार्कबॉट बँक स्टीलर मालवेअर (Sharkbot Bank Steeler Malware) काढून टाकल्याचं वृत्त मिळालं आहे. बॅन केलेल्या अ‍ॅप्सच्या यादीमध्ये सहा अ‍ॅप अशी होती, जी 15 हजारांहून अधिक वेळा डाउनलोड केली गेली होती.

पुढे वाचा ...

मुंबई, 11 एप्रिल : सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात टेक जायंट 'गुगल' (Google) अतिशय उपयुक्त ठरत आहे. गुगलशिवाय आपण आपल्या फास्ट फॉरवर्ड डेली लाईफची कल्पनाही करू शकत नाही. गुगलच्या प्ले स्टोअरवर (Google Play Store) अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. गुगलची ही अ‍ॅप्स (Google Apps) आपलं आयुष्य खूप सुखकर करतात. लोक त्यांच्या सोयीनुसार ही अ‍ॅप्स डाउनलोड करतात. ही गोष्ट लक्षात घेऊन काही डेव्हलपर्स प्ले स्टोअरवर बनावट अ‍ॅप्स अपलोड करतात. ही अ‍ॅप्स युजर्सचा डेटा चोरतात. यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये गुगल वापराच्या सुरक्षिततेबाबत (Google Security) प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या कारणास्तव गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरील काही अ‍ॅप्सवर बंदीची (Ban) कारवाई सुरू केली आहे. गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून काही शार्कबॉट बँक स्टीलर मालवेअर (Sharkbot Bank Steeler Malware) काढून टाकल्याचं वृत्त मिळालं आहे. बॅन केलेल्या अ‍ॅप्सच्या यादीमध्ये सहा अ‍ॅप अशी होती, जी 15 हजारांहून अधिक वेळा डाउनलोड केली गेली होती.

वृत्तानुसार, ही सहा अ‍ॅप्स अँड्रॉईड स्मार्टफोनच्या अँटिव्हायरस सोल्यूशनवर काम करत होती. नंतर असं आढळलं की, ही अ‍ॅप्स लॉगिन आयडीसारखे लोकांचे वैयक्तिक तपशील गोळा करत होती. ही अ‍ॅप्स इटली आणि यूकेमधील युजर्सना टार्गेट करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. चेक पॉईंट रिसर्चच्या ब्लॉग पोस्टवरून मिळालेल्या माहितीनुसार, गुगल प्ले स्टोअरवरील काही अ‍ॅप्स ओरिजनल अँटिव्हायरस अ‍ॅप्सच्या रुपात दिसत होती. त्यामुळे अनेक युजर्सनी ती डाउनलोडही केली होती. परंतु, शार्कबॉट हा एक अँड्रॉईड (Android) स्टीलर आहे. ज्याचा वापर डिव्हायसेस इन्फेक्ट करण्यासाठी, युजर्सचं लॉगिन क्रेडेन्शियल आणि पेमेंट डिटेल्स चोरण्यासाठी केला जातो.

ही अ‍ॅप्सही करण्यात आली बॅन

गुगलनं अलीकडेच प्ले स्टोअरवरील डझनभर अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. ही अ‍ॅप्स गुप्तपणे यूजर्सचे फोन नंबर आणि इतर महत्त्वाचा डेटा चोरत होती. बंदी घातलेल्या काही अ‍ॅप्समध्ये 'मुस्लिम प्रार्थना अ‍ॅप'चा (Muslim Prayer Apps) समावेश आहे. हे अ‍ॅप 1 कोटीहून अधिक वेळा डाउनलोड झालं होतं. याशिवाय बारकोड स्कॅनिंग अ‍ॅप आणि हायवे स्पीड ट्रॅप डिटेक्शन अ‍ॅपही बॅन करण्यात आली आहेत. क्युआर कोड स्कॅनिंग अ‍ॅपमध्ये डेटा-स्क्रॅपिंग कोड आढळला होता.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आलेलं अ‍ॅप युजर्सचं लोकेशन (User Location), ईमेल, फोन नंबर, जवळपासची डिव्हायसेस आणि पासवर्ड (Password) गोळा करत होतं. रिसर्चमध्ये असंही निदर्शनास आलं आहे की, मेजरमेंट सिस्टिम एसडीआरएलनं (SDRL) डेव्हलप केलेला एक एसडीकेसुद्धा (SDK) व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) डाउनलोडसाठी स्कॅन करू शकतो. आपल्या अ‍ॅपमध्ये विशिष्ट कोड वापरून त्या माध्यमातून ग्राहकांचा डेटा चोरण्याच्या उद्देशाने अ‍ॅप विकसित करून घेणाऱ्या अमेरिकेतील व्हर्जिनिया डिफेन्स कॉन्ट्रॅक्टर (Virginia Defense Contractor) या कंपनीशी ही कंपनी संबंधित आहे.

First published:

Tags: Application, Apps, Google