मुंबई, 14 ऑक्टोबर : अॅमेझॉनवर दुसऱ्यांदा Amazon Great Indian Festival सेल सुरू झाला आहे. या सेलला 13 ऑक्टोबरला सुरूवात झाली असून 17 ऑक्टोबरपर्यंत हा सेल आहे. यामध्ये रिअलमी, ओप्पो, सॅमसंग, शाओमी या कंपन्यांच्या स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर आणि मोठी सूट दिली जात आहे. स्मार्टफोनच्या यादीत शाओमीच्या लोकप्रिय Mi A3 च्या खरेदीवर तब्बल 8,450 रुपयांची सूट मिळू शकते. ही सवलत फक्त एक्सचेंज ऑफर अंतर्गत दिली जाणार आहे. Xiaomi च्या Mi A3 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 14,999 रुपये आहे. तो 12,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. यावर सध्या 2,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. त्याशिवाय अॅमेझॉन पे बॅलन्सवर 1 हजार रुपयांची कॅशबॅक ऑफरही आहे. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये 8 हजार 450 रुपयांची सवलत दिली जात आहे. एक्सचेंज ऑफरचा फायदा 17 ऑक्टोबरपर्यंत घेता येणार आहे. फोनच्या खरेदीसाठी icici बँकेचं क्रेडीट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरलं तर 10 टक्के सवलत मिळते. शाओमीच्या या फोनची फिचर्स जबरदस्त आहेत. यात 6.1 इंचाचा HD+ AMOLED डिस्प्ले आहे. वॉटरड्रॉप-स्टाइल नॉच असलेल्या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. Xiaomi चा हा स्मार्ट फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरवर काम करतो. 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असून 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. याशिवाय फ्रंटला 32 मेगापिक्सल कॅमेरा आहे. VIDEO : पैशांचा एवढा पाऊस झाला की नोटा मोजण्यासाठी आणावं लागलं मशीन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







