मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Google कडून धमाल गिफ्ट! अॅपलचं खास फीचर आता Android मध्ये, कसं वापराल?

Google कडून धमाल गिफ्ट! अॅपलचं खास फीचर आता Android मध्ये, कसं वापराल?

दरम्यान, हे माहिती लीक होण्याचं प्रकरण असल्याची माहिती थ्रेटपोस्टने दिली आहे. तर ही काही मोठी गोष्ट नाही असं फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचं म्हणणं आहे. Google सर्च रिझल्टमध्ये तिच माहिती आहे ज्याला वापरकर्त्यांनी पब्लिक करण्यासाठी निवडली आहे.

दरम्यान, हे माहिती लीक होण्याचं प्रकरण असल्याची माहिती थ्रेटपोस्टने दिली आहे. तर ही काही मोठी गोष्ट नाही असं फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचं म्हणणं आहे. Google सर्च रिझल्टमध्ये तिच माहिती आहे ज्याला वापरकर्त्यांनी पब्लिक करण्यासाठी निवडली आहे.

इतर Android फोनसह फोटो, फाइल्स, लिंक यासह कोणतीही मोठी फाईल सहजपणे शेअर करणं शक्य आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar
नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : गुगलने (Google) अँड्रॉइड यूजरसाठी (android users) एक खास फीचर आणलं आहे. 'Nearby Share' अशा नावाचं नवीन फीचर गुगलने बाजारात आणलं आहे. हे एक फाईल शेअरिंग फीचर आहे. जे Apple च्या एअरड्रॉप (AirDrop )प्रमाणे काम करेल. Android 6.0 वरील सॉफ्टवेअरवर चालणार्‍या सर्व डिव्हाइसवर हे नवीन फीचर काम करेल. इतर Android फोनसह फोटो, फाइल्स, लिंक यासह कोणतीही मोठी फाईल सहजपणे शेअर करणं शक्य आहे. सध्या हे फीचर गुगल पिक्सल फोन आणि सॅमसंग फोनसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. पण येत्या आठवड्यात Google उर्वरित अँड्रॉइड फोनसाठी सुद्धा याची ऑफर देईल अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, गूगलने लॉन्चिंगसह या फीचरचा वापर कसा करावा हे देखील सांगितलं आहे. मुंबईत या तारखेला पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून आधीच इशारा कसं वापराल 'Nearby Share' हे फीचर - याचा वापर करण्यासाठी, तुम्ही हवा असलेला कंन्टेंट निवडा. नंतर त्याला स्क्रीनच्या तळाशी ड्रॅग करा आणि NearbyShare क्लिक करा. - यानंतर, तुमच्या जवळ उभ्या असलेल्या Android यूजरला शेअर करण्यासाठी तुम्ही इतर फाईलदेखील निवडू शकता. फक्त 5 हजार रुपयांत सुरू करा Post Office बिझनेस, अशी कराल दमदार कमाई गूगलने दिलेल्या माहितीनुसार, अँड्रॉइड यूजर फाईल गुप्तपणेही शेअर करू किंवा इतर लोकं ती मिळवू शकतात. आणि जर त्यांना फाईल शेअर करू इच्छित नसेल तर ते स्वत: ला इंनव्हिजिबल असा पर्याय निवडू शकतात. येत्या काही महिन्यांत, हे Chromebook सह देखील काम करणार आहे. जेणेकरुन कोणत्याही Android फोन आणि Chromebook मध्ये जलद आणि सोप्या पद्धतीने फाईल्स शेअर केल्या जाऊ शकतात. कसं काम करतं हे फीचर? NearbyShare हे फीचर फाईल्स ट्रान्सफर करण्यासाठी यूजरच्या फोनचा Bluetooth Low Energy, WebRTC किंवा WiFi वापरतं. यामध्ये जे कनेक्शन लवकर मिळेत त्यांतून समोरच्या व्यक्तीला फाईल्स शेअर केल्या जाऊ शकतात.
First published:

पुढील बातम्या