मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत या तारखेला पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून आधीच इशारा

मुंबईत या तारखेला पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून आधीच इशारा

मुंबईतील तब्बल 26 जागांवर पाणी भरले आहे. पाणी भरल्यामुळे बेस्टची बस पाण्यातच थांबवण्यात आली. मुसळधार पावसामुळे बेस्ट बसचा मार्ग बदलण्यात आला आहे.

मुंबईतील तब्बल 26 जागांवर पाणी भरले आहे. पाणी भरल्यामुळे बेस्टची बस पाण्यातच थांबवण्यात आली. मुसळधार पावसामुळे बेस्ट बसचा मार्ग बदलण्यात आला आहे.

दोन दिवसापासून सतत पावसाची जोर कायम आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात पाणी साचलं आहे. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये रस्ते आणि गाड्या पाण्याखाली गेल्या आहे.

    मुंबई, 06 ऑगस्ट : गेल्या 3 दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने वादळाचं रुप धारण केलं आहे. दोन दिवसापासून सतत पावसाची जोर कायम आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात पाणी साचलं आहे. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये रस्ते आणि गाड्या पाण्याखाली गेल्या आहे. असाच पाऊस मुंबईत पुन्हा 11 ऑगस्टला होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई पाऊस केंद्रीय हवामान खात्याचे संशोधक डॉक्टर जेनामनी यांच्यानुसार आगामी 11 ऑगस्टला पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे परिसरामध्ये आजही पाऊस होण्याची शक्यता असून उत्तर कोकणमध्ये आगामी दोन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात जो पाऊस झाला आणि वेगाने वारे वाहले हे पंचवीस वर्षात पहिल्यांदाच झाले. बंगालच्या उपसागराच्या तुलनेमध्ये अरबी समुद्र अधिक सक्रिय असल्यामुळे हा मुसळधार पाऊस झाला आहे. जर रात्री उशिरापर्यंत पाऊस झाला असता तर मुंबईत विदारक परिस्थिती निर्माण झाली असती असे त्यांनी सांगितलं. फोटो दिसणाऱ्या या चिमुरडीने मृत्यूवर मिळवला विजय, 4 तास पुरात वाहिली आणि... मुसळधार पावसाने झोडपलं तरी मुंबईकरांसाठी आहे आनंदाची बातमी! दरम्यान, मुंबईसह (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad) जिल्ह्यांत आणि महाराष्ट्रातील घाट भागात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच हवामान विभागाकडून रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मित्राच्या डोळ्यांदेखत तरुणीला उचलून नेलं, 2 नराधमांनी केला बलात्कार मुसळधार पावसामुळे वाहतुक ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे मंत्रकाय, चर्चगेट, मुंबई विद्यापीठ आणि न्यायालयाचा परिसर जलमय झाला होता. अनेक झाड उन्मळून पडली आहेत. अशात मध्य रात्रीपासून पावसाचा जोर जरा कमी झाला असला तरी आजही मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या