मुंबई, 03 फेब्रुवारी : तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, जरा थांबा. कारण महिंद्रा आपली इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आणणार आहे. त्यामुळे तुम्ही काही वेळ प्रतीक्षा केली तर, तुम्हाला इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. महिंद्रा आपल्या ‘ऑटो एक्सपो 2020’ Auto Expo 2020 मध्ये ग्राहकांसमोर चार इलेक्ट्रिक कार आणणार असल्याची शक्यता आहे. महिंद्रा ऑटोमोटिव्हच्या (Mahindra Automotive) अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक टीझर (Teaser) लाँच करण्यात आला आहे. या टीझरमध्ये एसयुवी (SUV) कार दिसत असून तिची फक्त एक झलक दाखवण्यात आली आहे. ही कार पूर्णपणे ग्राहकांसमोर आणली नसल्याने सर्वांचीच उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. महिंद्राची ही इलेक्ट्रिक कार असल्याचं सांगितलं जात आहे. कारण, काही दिवसांपूर्वी ‘महिंद्रा ऑटोमोटिव्ह’नं ‘द फ्युचर इज इलेक्ट्रिक’ (The Future is Electric) म्हणत एक फोटो ट्विट केला होता. या फोटोमध्ये चार कारची झलक दिसत आहे. टीझरमध्ये दिसत असलेल्या कारचा या फोटोमध्येही समावेश आहे. महिंद्राची ही अपकमिंग सेकंड जनरेशन XUV500 असण्याची शक्यता आहे.
Fun just got a new look! Visit the Mahindra pavilion at the #AutoExpo2020 and discover the ultimate mode of thrill. We are sure you'll crave for more! #DrivenByPurpose pic.twitter.com/mHRzRjYndR
— Mahindra Automotive (@Mahindra_Auto) February 2, 2020
‘महिंद्रा ऑटोमोटिव्ह’नं काही दिवसांपूर्वी आणखी एक टिझर लाँच केला होता. या टीझरमध्येही कंपनीनं आपल्या नव्या गाडीची झलक दाखवली आहे. ही देखील इलेक्ट्रिक कार असल्याचं सांगितलं जात आहे. इलेक्ट्रिक कार लाँच करणार असल्याचं ‘महिंद्रा ऑटोमोटिव्ह’च्या ट्विटरवरून दिसत आहे. एटम (Atom) असं टीझरच्या अखेरीस दाखवण्यात आलं आहे, त्यामुळे महिंद्रा एटम (Mahindra Atom) ही महिंद्राची इलेट्रिक कार बाजारपेठेत लवकरच दाखल होणार आहे. आता या दोन्ही कारसाठी आणि आणखी कोणत्या नव्या कार महिंद्रा बाजारपेठेत भविष्यात आणणार आहे, यावरून ‘ऑटो एक्सपो 2020’मध्येच पडदा उठणार आहे. 7 फेब्रुवारीपासून ‘ऑटो एक्सपो 2020’ची सुरूवात होणार आहे.
Clean, Comfortable, Smart and more, as we are #DrivenByPurpose for a greener tomorrow.
— Mahindra Automotive (@Mahindra_Auto) January 30, 2020
Come and experience ATOM Live at the #AutoExpo2020 at the Mahindra pavilion hall no 10/N2 between 7-12 February 2020. pic.twitter.com/wX0w2PFZuF
अशी असू शकते किमत महिंद्रा आणि फोर्ड आता एकत्रितरित्या गाड्या बनवणार असल्याचं जगजाहीर आहे. असंही म्हटलं जातं की, दोन्ही कंपन्यांनी मिळून या नव्या गाड्यांची निर्मिती केली आहे. नव्या XUV500ची किमत (एक्स शोरूम किमत) 12.30 लाखांपासून सुरू होत असून 18.62 लाखांपर्यंत उपलब्ध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे

)








