जगभरात 22,484 अडल्ट कॉन्टॅक्ट असणाऱ्या वेबसाईट्स स्कॅन केल्या आहेत. या सर्व साईट्स युजर्सचा डेटा पुढे फॉर्वर्ड करत असल्याचं आढळल्याचं मायक्रोसॉफ्ट आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेन्नसिलवॅनिया अँड कार्नेगी मेलॉनच्या रिसर्चर्सने रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यात 93 टक्के वेबसाईट्समध्ये 74 टक्के पॉर्न वेबसाईट्स अशा होत्या ज्यांना गुगल आणि त्यांच्या कंपन्या ट्रॅक करत होत्या.
युजर्सकडून सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook देखील रिसर्चर्सच्या स्कॅनिंगमध्ये प्रत्येकी 10 पैकी एक पॉर्न साईट ट्रॅक करताना आढळलं आहे.
जगभरात केवळ 17 टक्के पॉर्न साईट्स प्रायव्हसी पॉलिसी फॉलो करतात. म्हणजेच 17 टक्के वेबसाईट्स अशा आहेत, ज्या Encryption चा वापर करतात असं सांगण्यात आलं.
युजर्सचं ट्रॅकिंग करुन जमा केलेल्या डेटाचं नेमकं काय होतं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. परंतु रिसर्चर्सने दिलेल्या माहितीनुसार गुगल आणि फेसबुक, पॉर्नोग्राफी वेबसाईट्ससाठीचा वापर युजरचा डेटा Advertising प्रोफाईल डेव्हलप करण्यासाठी करत असाव्यात असा अंदाज आहे.