मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

बुलेट ट्रेनपेक्षाही वेगानं धावते 'ही' इलेक्ट्रिक कार, क्रोएशियन EVनं रचला विश्वविक्रम

बुलेट ट्रेनपेक्षाही वेगानं धावते 'ही' इलेक्ट्रिक कार, क्रोएशियन EVनं रचला विश्वविक्रम

बुलेट ट्रेनपेक्षाही वेगानं धावते 'ही' इलेक्ट्रिक कार, क्रोएशियन कारनं रचला विश्वविक्रम

बुलेट ट्रेनपेक्षाही वेगानं धावते 'ही' इलेक्ट्रिक कार, क्रोएशियन कारनं रचला विश्वविक्रम

क्रोएशियन इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी रिमॅकनं (Rimac) अलीकडेच आपल्या नवीन 'नेवेरा' हायपरकारसह एक सर्वाधिक वेगाचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 नोव्हेंबर:  गेल्या काही वर्षांत जगभरात इलेक्ट्रिक कारची मागणी झपाट्याने वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं, ही या मागील कारणं आहेत. आजकाल अनेक अॅडव्हान्स, लक्झरी आणि हायटेक लक्झरी कार बाजारात आल्या आहेत. विविध प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानानं या कार सुसज्ज आहेत. असं असूनही, इलेक्ट्रिक कारच्या क्षमतेवर अजूनही प्रश्न उपस्थित होत आहेत. पण, लवकरच इलेक्ट्रिक कारदेखील हवेच्या वेगाशी स्पर्धा करताना दिसतील.

क्रोएशियन इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी रिमॅकनं (Rimac) अलीकडेच आपल्या नवीन 'नेवेरा' हायपरकारसह एक सर्वाधिक वेगाचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. 412 किलोमीटर प्रतितास वेगाने धावण्याचा विक्रम नोंदवत नेवेरानं जगातील सर्वांत वेगवान इलेक्ट्रिक कारचा किताब पटकावला आहे. ही क्रोएशियन हायपरकार रिमॅकचे चीफ टेस्ट अँड डेव्हलपमेंट ड्रायव्हर मिरो जर्नसेविक यांनी चालवली.

जीनिव्हा मोटर शोमध्ये लाँच झाली होती 'नेवेरा'

जर्मनीतील ऑटोमोटिव्ह टेस्टिंग पॅपेनबर्ग ट्रॅकवर चार किलोमीटर अंतराच्या दोन स्ट्रेट रनिंगदरम्यान नेवेराने हा विश्वविक्रम केला. या वेळी कार हायस्पीड मोडमध्ये चालवली गेली. ज्यामुळे ड्रॅग आणि डाउनफोर्समध्ये चांगलं संतुलन निर्माण झालं. नेवेरानं प्रथमच प्रतितास 412 किलोमीटर वेग गाठला आहे. रिमॅक टीमनं हे टारगेट ठेवलं होतं. 2018 च्या जीनिव्हा मोटर शोमध्ये C_Two संकल्पनेच्या रुपात ही कार प्रथम दाखवण्यात आली होती.

हेही वाचा: शक्यच नाही! अवघ्या 24 तासांत सोल्ड आउट झाली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, काय आहे तिची खासियत?

अतिशय शक्तिशाली कार

नेवेरा कारमध्ये चार इलेक्ट्रिक मोटर्स वापरण्यात आल्या आहेत. या चारही मोटर एक हजार 914 हॉर्स पॉवर जनरेट करतात. कार निर्मात्याच्या म्हणण्यानुसार, ही गाडी केवळ 1.95 सेकंदात प्रतितास 0 ते 100 किलोमीटर आणि 4.3 सेकंदात प्रतितास 0 ते 160 किलोमीटरपर्यंत वेग गाठू शकते. याशिवाय, 8.582 सेकंदात एक चतुर्थांश मैलांपेक्षा जास्त अंतर कापणारी ही जगातील सर्वात वेगवान कार बनली आहे.

ग्राहकांना मिळणार कमी वेगवान कार

जेव्हा ही कार मार्केटमध्ये लाँच केली जाईल, तेव्हा तिची वेग मर्यादा प्रतितास 352 किलोमीटर इतकी असू शकते. पण, विशेष परिस्थितींमध्ये तिचा वेग प्रतितास 412 किलोमीटरपर्यंत पोहोचेल अशी अॅडजस्टमेंट केली जाऊ शकते. जरी नेवेरा ही जगातील सर्वांत वेगवान इलेक्ट्रिक कार असली तरी, ती अद्याप नियमित पेट्रोल फ्रंट रनर कार्सना मागे टाकू शकलेली नाही.

First published:

Tags: Car, Electric vehicles