नवी दिल्ली, 2 डिसेंबर: भारतातील विमानतळांवर आता बोर्डिंग पासऐवजी थेट तुमचा चेहरा (Facial identification technology to be introduced at four airports in India) दाखवून प्रवेश मिळवता येणार आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. लवकरच देशातील (Experiment basis at four airports) चार विमानतळांवर प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली राबवण्यात येणार आहे. यामध्ये वाराणसी, पुणे, कोलकाता आणि विजयवाडा या विमानतळांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी मार्च महिन्यापासून ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार आहे.
अशी आहे योजना
विमानतळावर प्रवेश करताना प्रवाशांना दरवेळी आपली ओळख सादर करावी लागते. त्यामध्ये बराच वेळ जातो आणि दरवेळी कागदपत्रं सोबत बाळगावी लागतात. त्यासाठी आता नवी यंत्रणा विकसीत करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. यानुसार बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टिमसाठी एक ऍप तयार करण्यात येणार आहे. यामध्ये स्वतःच्या ओळखीचे तपशील, पॅन कार्ड, आधार कार्डाचे तपशील यांच्यासह प्रत्येकाच्या चेहऱ्याच्या बायोमेट्रिकही नोंदवले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा चेहराच हेच त्याचं ओळखपत्र असणार आहे. विमानतळावर प्रवेश करताना कुठलंही कार्ड दाखवण्याऐवजी थेट चेहराच स्कॅन होईल आणि प्रवाशांना विमानतळावर प्रवेश मिळेल.
हे वाचा-खतरनाक Omicron चा धोका कमी करण्याचा मार्ग सापडला; आरोग्यमंत्र्यांचा दावा
योजना असेल पर्यायी
जे नागरिक या योजनेअंतर्गत स्वतःच्या चेहऱ्याचे बायोमेट्रिक्स ऍपवर अपलोड करतील, त्यांना या योजनेचा फायदा घेणार आहे. मात्र हे करणं कुणासाठीही बंधनकारक नसेल. सध्या प्रचलित पद्धतीनुसार ओळखपत्र आणि बोर्डिंग पास दाखवून नागरिक विमानतळावर प्रवेश मिळवू शकतील, असंही नागरी उड्डयन मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
या सिस्टीमनुसार रजिस्ट्रेशन केलेल्या यात्रेकरूंची नोंद सीआयएसएफ, एअरलाईन आणि इतर सुरक्षा यंत्रणांकडे होणार आहे. त्यामुळे चेहरा स्कॅन झाल्यावर लगेचच प्लॅफगेट उघडेल आणि प्रवाशांना थेट आतमध्ये प्रवेश मिळणं शक्य होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airplane, Airport, Central government