मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /पोको, आयफोन असे बिग बजेट फोन स्वस्तात खरेदीची अखेरची संधी! पाहा Flipkart इयर एंड सेलमधील बंपर ऑफर्स

पोको, आयफोन असे बिग बजेट फोन स्वस्तात खरेदीची अखेरची संधी! पाहा Flipkart इयर एंड सेलमधील बंपर ऑफर्स

रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. तो वेरिफाय करून सबमिट करा. एकदा अॅप्लिकेशन अप्रुव्ह झाल्यानंतर Flipkart Pay Later सर्विस तुमच्या अकाउंटसाठी अॅक्टिव्हेट केली जाईल.

रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. तो वेरिफाय करून सबमिट करा. एकदा अॅप्लिकेशन अप्रुव्ह झाल्यानंतर Flipkart Pay Later सर्विस तुमच्या अकाउंटसाठी अॅक्टिव्हेट केली जाईल.

फ्लिपकार्टच्या (Flipkart) इयर एंड सेलमध्ये (Year End Sale) अनेक फोनवर भरघोस सूट मिळत आहे. यामध्ये पोको F3 GT (Poco F3 GT), आयफोन 12 मिनी (iPhone 12 mini), आयफोन 12 (iPhone 12), रियलमी 8i (Realme 8i), Redmi 9i, Realme Narzo 50A, Poco C31, Realme GT Master Edition, iPhone SE आणि Moto G60 सारखे फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई, 31 डिसेंबर : ई-कॉमर्स साईट असणाऱ्या फ्लिपकार्टवर सध्या इयर एंड सेल (Flipkart Year End Sale) सुरू आहे. आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बिग बजेट स्मार्टफोन्सवर तगडा डिस्काउंट (Smartphones discount on Flipkart) मिळवण्याची आज अखेरची संधी आहे. या सेलमध्ये पोको (Poco), ॲपल (Apple), रिअलमी (Realme), मोटोरोला (Moto), रेडमी (Redmi) अशा कंपन्यांच्या विविध फोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. पाहूयात याबाबत सविस्तर माहिती.

    ॲपल कंपनीचे फोन सहसा महाग असल्यामुळे बरेचजण तो घ्यायचे टाळत असतात. मात्र, ॲपलचा फोन वापरण्याची इच्छाही बऱ्याच जणांना असते. तुम्हालाही आयफोन वापरण्याची इच्छा असेल, तर फ्लिपकार्टवर अगदी कमी किंमतीत आयफोन उपलब्ध आहेत. ॲपलच्या आयफोन 12 मिनी (iPhone 12 mini on Flipkart) या मॉडेलचे 64 जीबी व्हर्जन केवळ 41.199 रुपयांना मिळत आहे. तसेच, याच्या 128जीबी आणि 256जीबी व्हर्जन्सची किंमत अनुक्रमे 55,199 आणि 65,199 रुपये आहे. यासोबतच ॲपलच्या (Apple offers on Flipkart) आयफोन 12, आयफोन SE या स्मार्टफोनवरही डिस्काउंट मिळत आहे.

    पोको X3 प्रो (Poco X3 pro on Flipkart) हा आणखी एक बिग बजेट स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अगदीच कमी किंमतीत उपलब्ध आहे. सेलमध्ये याच्या 6 जीबी रॅम असलेल्या व्हेरियंटची किंमत 18,999 रुपये आहे. सध्या हे व्हर्जन आउट ऑफ स्टॉक असले, तरी लवकरच ते उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याच फोनचे 8 जीबी रॅम असलेले व्हर्जन सेलमध्ये 20,999 रुपयांना मिळत आहे. यासोबतच पोकोच्या F3 GT आणि C31 या स्मार्टफोन्सवरही (Poco smartphones on Flipkart) डिस्काउंट मिळत आहे.

    वर्षाच्या शेवटच्या दिवशी जिंका 20000 रुपये! Amazon App देतंय जबरदस्त संधी

    रिअलमी फोन्सबाबत (Flipkart Realme offers) बोलायचे झाल्यास, त्यातील GT Neo 2 या स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. या मोबाईलचे 128 जीबी मेमरी असणारे व्हर्जन 31,999 रुपयांना; तर 256 जीबी मेमरी असणारे व्हर्जन 35,999 रुपयांना मिळत आहे. यासोबतच रिअलमीच्या 8i. नार्झो 50A, C21Y आणि GT मास्टर एडिशन (Realme GT Master Edition on Flipkart) या स्मार्टफोन्सवरही डिस्काउंट मिळत आहे. रिअलमी मोबाईल्सवर फ्लिपकार्ट अतिरिक्त कार्ड डिस्काउंटही देत आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास दोन ते चार हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळत आहे.

    यासोबतच या सेलमध्ये सॅमसंग F12, व्हिव्हो X70 प्रो, ओप्पो रेनो 6 5G. रेडमी 9i आणि इतरही बऱ्याच स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळत आहे. तेव्हा जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्ट सध्या तुम्हाला सर्वात चांगले पर्याय देऊ शकेल!

    First published:

    Tags: Flipkart, Iphone, Online shopping