ऑक्टोबरमध्ये झालेल्या बिग बिलियन डेज सेलनंतर (Big Billion Days sale) फ्लिपकार्टने आता फ्लिपस्टार्ट ( Flipkart Flipstart Days sale) डेज हा सेल सुरू केला आहे. 1 डिसेंबरपासून ते 3 डिसेंबरपर्यंत हा सेल सुरू राहील. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर तसंच कपडे, खेळांची उपकरणं आणि अन्य सामानावर भरपूर सूट देण्यात आली आहे. फ्लिपस्टार्ट डेज सेलसाठीच्या लँडिंग पेजवर हा सेल लाइव्ह करण्यात आला आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर 80 टक्के सवलतीच्या ऑफरची जाहिरात आहे. तसेच इतर वस्तुंच्या डील्सबरोबरच फ्लिपकार्टने फ्लिपस्टार्ट डेजच्या सेलदरम्यान लॅपटॉपवर 30 टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे.
9th जनरेशनमधील इंटेल कोअर i7 प्रोसेसरसह लिनोव्हो आयडियापॅड एल 340 (Levono Ideapad L340) ची किंमत 98,390 रुपये आहे पण सेलमध्ये यावर 27,400 रुपयांची सूट देण्यात आली आहे आणि हा लॅपटॉप 70,990 रुपयांना ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. त्याशिवाय फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्क्यापर्यंत अनलिमिटेड कॅशबॅक आणि अॅक्सिस बँकेच्या बझ क्रेडिट कार्डवर 5 टक्के सूट खरेदीदार घेऊ शकतात. या व्यतिरिक्त, ईएमआयवर लिनोव्हो आयडियापॅड एल 340 खरेदी करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे आणि खरेदीदार एक्सचेंज ऑफरमध्ये 15,650 रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकतात.
9th जनरेशनमधील इंटेल कोअर i5 प्रोसेसरसह ASUS TUF गेमिंग लॅपटॉप हा 85,990 रुपयांच्या स्टिकर किंमतीवर उपलब्ध आहे त्यावर 24% इतकी म्हणजे 21,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे हा लॅपटॉप आता 64,990 रुपयांना ग्राहकांना मिळणार आहे. त्याशिवाय खरेदीदारांना फ्लिपकार्ट बँक क्रेडिट कार्डवर 5 अमर्यादित कॅशबॅक मिळेल आणि अॅक्सिस बँकच्या बझ क्रेडिट कार्डावर 5 टक्के सूटही मिळेल. याव्यतिरिक्त, ईएमआयवर ASUS Gaming Laptop खरेदी करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे आणि खरेदीदार एक्सचेंज ऑफरमध्ये 15,650 रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकतात.
10th जनरेशनमधील इंटेल i5 प्रोसेसर असलेला MI नोटबुक 14 हा त्याच्या 52,999 रुपयांच्या मूळ किंमतीपेक्षा 6,000 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे. म्हणजे हा लॅपटॉप तुम्ही सेल मध्ये 46,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. त्याशिवाय खरेदीदारांना फ्लिपकार्ट बँक क्रेडिट कार्डवर 5 अमर्यादित कॅशबॅक मिळेल आणि अॅक्सिस बँकच्या बझ क्रेडिट कार्डावर 5 टक्के सूटही मिळेल.
इंटेलच्या 10th जनरेशनमधील कोर i5 प्रोसेसरसह HP 15s हा लॅपटॉप 49,490 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, त्याची मूळ किंमत ही 57,028 रुपये इतकी असून त्यावर 7,538 रुपयांची सूट देण्यात आली आहे. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदीदार 15,650 रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकतात आणि ईएमआयवर एचपी 15s देखील खरेदी करू शकतात, ह्या साठी मासिक हप्ता 5,499 रुपयांपासून सुरू होत आहे. त्याशिवाय खरेदीदारांना फ्लिपकार्ट बँक क्रेडिट कार्डवर 5 अमर्यादित कॅशबॅक मिळेल आणि अॅक्सिस बँकच्या बझ क्रेडिट कार्डावर 5 टक्के सूटही मिळेल.
पॅव्हिलियन एक्स 360 हा 62,890 रुपये किंमतीला उपलब्ध आहे. यावर 12,835 रुपयांची सूट देण्यात आली आहे याची मूळ किंमत 74,875 रुपयांपेक्षा अधिक आहे. एचपी पॅव्हिलियन एक्स 360घेण्यासाठी खरेदीदार इतर लॅपटॉपप्रमाणे ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत. त्याशिवाय खरेदीदारांना फ्लिपकार्ट बँक क्रेडिट कार्डवर 5 अमर्यादित कॅशबॅक मिळेल आणि अॅक्सिस बँकच्या बझ क्रेडिट कार्डावर 5 टक्के सूटही मिळेल.