मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Flipkart वर आजपासून सेल सेल सेल! Realme, Samsung, Redmi च्या स्मार्टफोनवर भरघोस सूट

Flipkart वर आजपासून सेल सेल सेल! Realme, Samsung, Redmi च्या स्मार्टफोनवर भरघोस सूट

Flipkart

Flipkart

Flipkart Offers: आता फ्लिपकार्टनेही त्यांच्या ग्राहकांसाठी इलेक्ट्रॉनिक सेलची (Flipkart Electronic sale) घोषणा केली आहे.

नवी दिल्ली, 10 जुलै:  फ्लिपकार्टच्या ग्राहकांना, तसेच शॉपिंगची प्रचंड आवड असणाऱ्यांना एक खुशखबर आहे. ज्याप्रमाणे ॲमेझॉनने (Amazon) नुकतीच Amazon Prime Days Sale 2021 ची घोषणा केली. त्याप्रमाणेच आता फ्लिपकार्टनेही त्यांच्या ग्राहकांसाठी इलेक्ट्रॉनिक सेलची (Flipkart Electronic sale) घोषणा केली आहे. आज, 10 जुलै 2021पासून हा सेल सुरू होत असून 13 जुलै 2021 पर्यंत हा सेल चालू राहणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला टीव्ही (TV), ॲक्सेसरीज (Accessories), मोबाइल (Mobile) यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. या सेलमध्ये तुम्ही रियलमी (Realme) X3 SZ हा मोबाइल 6000 रुपयांच्या, तर रियलमी 7 प्रो ( Realme 7 Pro) हा स्मार्टफोन 4000 रुपयांच्या सवलतीमध्ये खरेदी करू शकणार आहात. याचसोबत सॅमसंग (Samsung), पोको (Poco) आणि रेडमी (Redmi) या कंपनीचे फोन्सही स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत.

फ्लिपकार्टच्या या इलेक्ट्रॉनिक सेलबद्दल आणखी काही माहिती घेऊ या.

वर म्हटल्याप्रमाणे रियलमी 7 प्रो हा फोन या सेलमध्ये 4000 रुपयांच्या डिस्काउंटवर मिळणार आहे. तसंच हा फोन Realme.com या वेबसाइटवर देखील खरेदी करता येऊ शकणार आहे. ॲक्सिस बँकेच्या कस्टमर्सना 10 टक्क्यांपर्यंत इंस्टंट सवलत मिळणार असून, ही सवलत जास्तीत जास्त 750 रुपयांपर्यंत असेल.

सॅमसंग गॅलेक्सी F62 (Samsung Galaxy F62) या स्मार्टफोनवर सर्वांत मोठी सूट मिळणार आहे. 29,999 रुपयांचा फोन तुम्ही फक्त 19,999 रुपयांत खरेदी करू शकणार आहात.

Realme X7 Pro या स्मार्टफोनवर 3000 रुपयांची सूट मिळणार आहे. Poco X3 Pro हा फोन 23,999 रुपयांऐवजी फक्त 17,249 रुपयांमध्ये मिळू शकणार आहे. या फोनच्या डिस्प्लेचा 120Hz रिफ्रेश रेट आणि स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसर ही या फोनची खासियत आहे.

हेही वाचा- Samsung Mega Monsoon Sale: हा प्रीमियम 5G स्मार्टफोन झाला अत्यंत स्वस्त, मिळेल 8GB RAM आणि 120Hz चा डिस्प्ले

Realme C15 आणि Realme C15s या फोन्सवर कस्टमर्सना 1000 रुपयांची सूट मिळणार आहे.

6.53 इंचांचा HD+ डिस्प्ले आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी असलेला रेडमी 9i या स्मार्टफोनचा 4 जीबी व्हॅरिएंट ग्राहकांना 9999 रुपयांऐवजी 8299 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

हेही वाचा- कोरोनातून बरं झाल्यानंतर हे Smartwatch ठरेल फायदेशीर; आरोग्याच्या समस्यांविषयी देईल अलर्ट

अशा प्रकारे फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुम्हाला या सर्व फोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर किंवा संबंधित फोनच्या वेबसाइटवर मिळेल. त्यामुळे आता तुम्हाला हवा असलेला फोन तुम्ही सवलतीच्या दरात लगेच विकत घेऊ शकता.

First published:

Tags: Discount offer, Flipkart, Sale offers, Smartphones