मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Flipkart Sale : नवा फोन घ्यायचाय? 4 दिवस अतिशय स्वस्तात खरेदी करा आयफोन 14 सह हे स्मार्टफोन

Flipkart Sale : नवा फोन घ्यायचाय? 4 दिवस अतिशय स्वस्तात खरेदी करा आयफोन 14 सह हे स्मार्टफोन

फाईल फोटो

फाईल फोटो

तुम्ही जर ऑनलाइन मोबाईल खरेदीचं नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आघाडीची ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर उद्यापासून (11 मार्च) ‘बिग सेव्हिंग डेज’ सेल सुरू होत आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई 10 मार्च : गेल्या काही वर्षांत ऑनलाइन शॉपिंगकडे लोकांचा कल वाढला आहे. ग्राहकांची गरज आणि मागणी लक्षात घेत ई-कॉमर्स वेबसाईट्स रोजच्या गरजेच्या वस्तू, कपडे, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, औषधं, अन्नधान्य, कॉस्मेटिक्स, मोबाईल आदी गोष्टी उपलब्ध करून देत आहेत. विशेष म्हणजे ऑनलाइन खरेदीवर ग्राहकांना वीकेंड, सणासुदीच्या निमित्ताने खास ऑफर, डिस्काउंट, कॅशबॅक मिळत असल्याने ग्राहक या खरेदीला प्राधान्य देत आहेत. तुम्ही जर ऑनलाइन मोबाईल खरेदीचं नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आघाडीची ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर उद्यापासून (11 मार्च) ‘बिग सेव्हिंग डेज’ सेल सुरू होत आहे. यात तुम्हाला आयफोन 14, पिक्सल 7 सारखे खास स्मार्टफोन डिस्काउंटमध्ये खरेदी करता येणार आहेत. `इंडिया टुडे`ने याविषयीची माहिती दिली आहे.

  फ्लिपकार्टवर 11 मार्चपासून बिग सेव्हिंग डेज सेल सुरू होत आहे. हा सेल 15 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये आयफोन 14, आयफोन 14 प्लस, नथिंग फोन (1), पिक्सल 6a आणि इतर लोकप्रिय स्मार्टफोन्स विक्रीसाठी उपलब्ध असतील.यासाठी खाल डिल ऑफर केल्या जाणार आहेत. फ्लिपकार्ट या सेलदरम्यान आयसीआयसीआय बँकेच्या कार्डधारकांसाठी स्पेशल डिल्स आणि डिस्काउंट ऑफर करणार आहे. फ्लिपकार्टने ऑफर्स जाहीर केल्या नसल्या तरी या ई-कॉमर्स वेबसाईटने वेबसाईटवर काही डिल्सची थोडी माहिती दिली आहे. त्यानुसार ग्राहकांना सेल दरम्यान कोणत्या डिल्स मिळू शकतात, ते जाणून घेऊया.

  फास्ट चार्जरसाठी कोणती वायर चांगली? आताच माहित करुन घ्या नाहीतर मिळेल धोका

  गुगल पिक्सल 7 हा स्मार्टफोन नुकताच लाँच झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत 59,999 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये हा स्मार्टफोन 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होईल. पिक्सल 7 सीरिजच्या चाहत्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या शिवाय पिक्सल 7 प्रो देखील या सेलदरम्यान सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असेल. पण या स्मार्टफोनची सवलतीतील किंमत किती असेल याची घोषणा करण्यात आलेली नाही. या दोन्ही डिव्हाईसमध्ये खास फीचर्स आहेत. तसंच त्यांचा परफॉर्मन्स उत्तम आहे. तुम्ही जर तुमचा फोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर हे स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.

  नथिंग फोन (1) हा लोकप्रिय स्मार्टफोन या सेलमध्ये मोठ्या डिस्काउंटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. या स्मार्टफोनच्या 128 GB बेस व्हेरियंटची 27,999 रुपयांना विक्री होत आहे. पण फ्लिपकार्ट सेलमध्ये बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर एकत्र करून डिव्हाइसची किंमत आणखी 25,000 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. फ्लिपकार्टने नथिंग फोनसंदर्भातील डिल्सची माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. सेल सुरू होताच यासंदर्भात माहिती स्पष्ट होईल.

  तुम्ही देखील फोनच्या सेफ्टीसाठी कव्हर लावता का? पण ते फोनसाठी सेफ नाही तर अनसेफ

  फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस कमी किमतीत उपलब्ध होऊ शकतात. टिझर्समधील माहितीनुसार, आयफोन 14 ची किंमत 60,009 ते 69,999 रुपयांदरम्यान असू शकते. त्याचप्रमाणे आयफोन 14 प्लसदेखील फ्लिपकार्ट सेल दरम्यान 80,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होऊ शकतो. सध्या आयफोन 14 फ्लिपकार्टवर 71,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या आयफोनची मूळ किंमत 79,999 रुपये आहे. पण फ्लिपकार्टवर तो सवलतीत मिळत आहे. तथापि सेल दरम्यान आयफोन 60,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता यावा यासाठी तुम्ही बँक ऑफर किंवा एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता. यामुळे आयफोन 14 या किंमतीत तुम्हाला सहजपणे मिळून जाईल.

  First published:
  top videos

   Tags: Flipkart, Mobile Phone