4 ऑक्टोबर 2021 रात्रीपासून तर 5 ऑक्टोबर 2021 च्या पहाटे चार वाजेपर्यंत संपूर्ण जगात फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअप (WhatsApp) अचानक पूर्णपणे ठप्प (Facebook Outage) झालं. जगभरातील यूजर्सचे मेसेज, कॉल्स, इतकंच काय तर ऑफिसचं कामसुद्धा ठप्प झालं. अनेकांसाठी जगाशी संपर्क तुटल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान अशाप्रकारे भविष्यात परिस्थिती निर्माण झाल्यास कुणाशीही संवाद तुटू नये याकरता काही पर्याय तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे.
तुम्ही हे इंस्टंट मेसेजिंग अॅप वापरून तुमच्या मित्र-मैत्रिणींशी, कुटुंबीयांशी संपर्क सुरू ठेवू शकता. अर्थात फेसबुकच्या मालकीचे असणारे कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा इंस्टंट मेसेजिंग अॅप बंद झाल्यास तुम्हाला या Apps चा वापर करून इतरांच्या संपर्कात राहता येईल
टेलिग्राम (Telegram)- Whatsapp ला पर्याय असणारे हे अॅप तसे सर्वाधिक जणांना माहित आहे. अनेकजण या अॅपचा वापरही करतात. यामध्ये व्हॉट्सअॅप प्रमाणेच इन्क्रीप्शनसह महत्त्वाचे फीचर्स मिळतात. यामध्ये व्हॉट्सअॅप चॅट्स हस्तांतरित करण्याचीही सुविधा आहे. हे अॅप देखील फ्री आहे…