मुंबई, 31 ऑक्टोबर : सोशल मीडियावर ब्लू टिकसाठी लोक खूप उत्सुक असतात. प्रोफाइलवर निळा बॅज मिळाल्याने, तुमचं खातं व्हेरिफाईड लिस्टमध्ये येते. परिणामी अकाउंटची विश्वासार्हताही वाढते. अनेकांना आपल्या अशी ब्लू टीक मिळावी अशी इच्छा असते. Facebook वर, युजर्सला एक निळा बॅज मिळतो, जो त्यांच्या नावापुढे टीकच्या स्वरुपात दिसतो. त्यामुळे हे खाते बनावट नसल्याचे स्पष्ट होते. तुम्हालाही ब्लू टिक हवी असेल तर काळजी करू नका, काही सोप्या स्टेप्स फोलो करा. यासाठी तुम्ही सेलिब्रिटी असण्याची आवश्यकता नाही.
तुमचं Facebook पेज आणि प्रोफाइल लोकांसाठी योग्य आहे का? अकाउंट किंवा पेज व्हेरिफिकेशन निकष पूर्ण करते का? हे तपासण्यासाठी कंपनी अनेक पद्धतीने तुमच्या खात्याचे मूल्यांकन करते. ब्लू टिक मिळविण्यासाठी, युजर्सना एक फॉर्म भरावा लागेल.
Step 1: पेज किंवा प्रोफाईल यापैकी तुम्हाला काय व्हेरिफाय करायचे आहे? हे फॉर्ममध्ये सांगावे लागेल.
Step 2: यानंतर डॉक्युमेंट कन्फर्म करण्यासाठी पहिली पायरी येते. येथे तुम्ही Choose File वर जाऊन तुमच्या कोणत्याही डॉक्युमेंटची सॉफ्ट कॉपी अपलोड करू शकता. ते काहीही असू शकते, मग ते DL, पासपोर्ट किंवा कोणताही राष्ट्रीय ओळखपत्र असेल.
वाचा - Facebook Meta : मेटामध्ये काम करणाऱ्यांसाठी वाईट बातमी, कंपनी करणार नोकर कपात
Step 3: आता दुसऱ्या स्टेपमध्ये, तुमचे पेज किंवा प्रोफाईल ज्या प्रसिद्ध व्यक्ती, सेलिब्रेटी किंवा ब्रँड दाखवते ते सार्वजनिक हिताचे असावे. येथे तुम्हाला कॅटेगरी निवडावी लागेल. यामध्ये अनेक पर्याय आहेत. न्यूज/माध्यम, संगीत, खेळ, मनोरंजन इ. यामध्ये तुमच्यानुसार एक निवडा.
Step 4: त्यानंतर तुमचा देश निवडा.
Step 5: आता तुम्हाला Audience निवडावे लागेल. तुमचे पेज किंवा प्रोफाइल फॉलो करणाऱ्या लोकांबद्दल येथे सांगा. ते कोण आहेत, त्यांना कशात स्वारस्य आहे आणि ते तुम्हाला फोलो का करतात याबद्दल माहिती समाविष्ट करा.
Step 6: तुमचे पेज किंवा प्रोफाइल सार्वजनिक हिताचे आहे हे दर्शविण्यासाठी तुम्हाला 5 लेख, सोशल मीडिया खाती आणि इतर लिंक जोडणे आवश्यक आहे. सशुल्क किंवा प्रमोशनल कंटेंट येथे वैध असणार नाही. हे ऑप्शनल स्टेप असल्याचे फेसबुकचे म्हणणे आहे.
Step 7: या सर्व स्टेपनंतर, तुम्हाला Send बटणावर टॅप करावे लागेल. यानंतर, तुम्हाला एक मॅसेज येईल की तुमचे खाते व्हेरिफाय झाले आहे की नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Facebook