मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Internet Connectivity: आता दिवसभर मोफत घ्या हाय स्पीड इंटरनेटचा आनंद, ‘या’ कंपनीनं आणला खास प्लॅन

Internet Connectivity: आता दिवसभर मोफत घ्या हाय स्पीड इंटरनेटचा आनंद, ‘या’ कंपनीनं आणला खास प्लॅन

Internet Connectivity: आता दिवसभर घ्या हाय स्पीड इंटरनेटचा आनंद, ‘या’ कंपनीनं आणला खास प्लॅन

Internet Connectivity: आता दिवसभर घ्या हाय स्पीड इंटरनेटचा आनंद, ‘या’ कंपनीनं आणला खास प्लॅन

Excitel Broadband कंपनीनं एक नवीन प्लॅन आणला आहे. या प्लॅन अंतर्गत कनेक्टिव्हिटीची समस्या निर्धारित वेळेत सोडवली नाही, तर ग्राहकांना हाय-स्पीड इंटरनेट सेवा मोफत दिली जाईल.

    मुंबई, 14 ऑगस्ट: इंटरनेट (Internet) ही काळाची गरज झाली आहे. अलीकडच्या काळात आपण अनेक गोष्टींसाठी इंटरनेटवर अवलंबून असतो. पण जरा विचार करा, जर तुम्हाला हाय स्पीड इंटरनेट सेवा संपूर्ण दिवस मोफत वापरण्याची संधी मिळाली तर? एका ब्रॉडबँड कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी अशी सुविधा आणली आहे. खरंच, Excitel ब्रॉडबँडनं आपल्या ग्राहकांसाठी अतिशय झक्कास सॉल्यूशन सॉल्विंग पॉलिसी आणली आहे. नवीन पॉलिसीनुसार, जर कंपनी ग्राहकांच्या कनेक्टिव्हिटीची समस्या निर्धारित वेळेत सोडवू शकली नाही, तर ती ग्राहकांना दिवसभर मोफत हाय-स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करेल. या पॉलिसीबद्दल सविस्तर माहिती घेऊया. Exitel आपल्या ग्राहकांना अशा प्रकारे देणार मोफत इंटरनेट सेवा- Excitel ब्रॉडबँड कंपनी आपल्या ग्राहकांना केवळ चार तासांत त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन देते. कंपनीनं आपल्या टर्म अँड कंडिशन पेजमध्ये म्हटलं आहे की, तक्रार दाखल केल्यापासून पुढील चार तासांच्या आत, जर ग्राहकाच्या समस्येचं निराकरण झालं नाही, तर त्याला Exitel कडून एका दिवसासाठी मोफत अतिरिक्त सेवा देण्यात येईल. हेही वाचा- तुमचं Whatsapp चॅट किती सुरक्षित? लिक होण्याची किती शक्यता? पहा कंपनी काय म्हणते? खरंतर, पॉलिसीत असं नमूद केलं आहे की, प्रत्येक चार तासांसाठी Axital कनेक्टिव्हिटीमध्ये आलेल्या समस्येचं निराकरण करू शकली नाही, तर कंपनी तिच्या वापरकर्त्यांना 24 तास अतिरिक्त सेवा प्रदान करेल. होय, परंतु या समस्येचं निराकरण करण्यासाठी एक वेळ मर्यादा देखील आहे आणि ती सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत आहे. रात्री 9 नंतर किंवा सकाळी 9 पूर्वी दाखल केलेली कोणतीही समस्या वर नमूद केल्याप्रमाणे विचारात घेतली जाणार नाही. एक्साइटल हे ग्राहकांना परवडणाऱ्या काही ब्रॉडबँड प्लॅन प्रदान करण्यासाठी ओळखली जाते. तुम्हाला खरोखर परवडणारं फायबर ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन हवं असल्यास, तुम्ही एक्सिटलचा प्लॅन पाहू शकता. कंपनी शक्य तितक्या लवकर अनेक शहरांमध्ये विस्तार करत आहे. ती तुमच्या शहरात उपलब्ध आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता आणि कंपनीच्या कस्टमर केअरशीही संपर्क साधू शकता.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Internet

    पुढील बातम्या