मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुमचं Whatsapp चॅट किती सुरक्षित? लिक होण्याची किती शक्यता? पहा कंपनी काय म्हणते?

तुमचं Whatsapp चॅट किती सुरक्षित? लिक होण्याची किती शक्यता? पहा कंपनी काय म्हणते?

व्हॉट्सअॅप चॅटची सुरक्षा आणि गोपनीयतेबाबत मेटा नेहमीच वादात सापडला आहे. यापूर्वीही व्हॉट्सअॅपवर गोपनीयतेचे उल्लंघन होत असल्याचे आरोप झाले आहेत. या आरोपांवर कंपनीने वेळोवेळी स्पष्टीकरणही दिले आहे. पण तुमची व्हॉट्सअॅप चॅट किती सुरक्षित आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 ऑगस्ट : आपल्या दैनंदिन वापरातलं एक महत्त्वाचं अ‍ॅप म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप. या अ‍ॅपमुळे साधे टेक्स्ट एसएमएस जणू बंदच झाले आहेत. जवळपास सर्वांच्याच स्मार्टफोनवर हे अ‍ॅप आपल्याला दिसून येतं; मात्र हेच व्हॉट्सअ‍ॅप चॅट (Whatsapp Chat) किती सुरक्षित आहे याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपची पॅरेंट कंपनी असलेल्या ‘मेटा’वर याआधीही प्रायव्हसीच्या उल्लंघनाचे आरोप झाले आहेत; मात्र कंपनीदेखील वेळोवेळी आपलं चॅट सुरक्षित (Whatsapp chat safety) असल्याचा दावा करत असते. दोन व्यक्तींव्यतिरिक्त तिसरी व्यक्ती तर सोडाच, पण खुद्द कंपनीही त्यांचं चॅट वाचू शकत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नुकतंच व्हॉट्सअ‍ॅपने काही नवीन अपडेट्स लाँच केले आहेत. त्यानंतर कंपनीने सुरक्षेसंबंधी आणखी काही दावे (Whatsapp safety claims) केले आहेत. 'TV9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एंड टू एंड एन्क्रिप्टेड व्हॉट्सअ‍ॅप म्हणतं, की त्यांचे चॅट एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड (Whatsapp End-to-End encryption) असतात. प्रत्येक पर्सनल मेसेज आपोआप एन्क्रिप्टेड, प्रोटेक्टेड आणि प्रायव्हेट असतो. म्हणजेच, ज्याने मेसेज पाठवला आहे, आणि ज्याला मेसेज गेला आहे या दोन व्यक्तींव्यतिरिक्त तिसरी व्यक्ती परवानगीशिवाय हा मेसेज वाचू शकत नाही. एवढंच नव्हे, तर खुद्द व्हॉट्सअ‍ॅप किंवा मेटा कंपनीदेखील हे मेसेज वाचू शकत नसल्याचं कंपनीने म्हटलं आहे. अशाच प्रकारे क्लाउडवरच्या पर्सनल मेसेजच्या बॅकअपसाठीदेखील (Whatsapp Cloud Backup) कंपनीने नवी सुविधा सुरू केली आहे. यासाठी युझर्सना एन्क्रिप्टेड बॅकअप सुरू करण्याची गरज आहे. त्यानंतर आय क्लाउड किंवा गुगल ड्राइव्हवर तुमचे मेसेज सुरक्षित राहणार आहेत. iPhone, iPad आणि Airpods Pro अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम सेलमध्ये स्वस्तात खरेदी करा, किती पैसे वाचतील? व्ह्यू वन्स फीचर अपडेट कंपनीने काही दिवसांपूर्वी व्ह्यू वन्स (Whatsapp View once screenshot) हे फीचर लाँच केलं. या माध्यमातून कोणताही फोटो वा व्हिडिओ एकदा पाहिल्यानंतर गायब होत असे; मात्र यात मोठी गोम अशी होती, की त्याचा स्क्रीनशॉट काढता येत होता. आता तसं करता येणार नसल्याचं कंपनीने म्हटलं आहे. डिसअपीअरिंग मेसेज स्नॅपचॅटसारखंच आता व्हॉट्सअ‍ॅपवरही डिसअपीअरिंग मेसेज (Disappearing Messages) सुविधा आणण्यात आली आहे. अर्थात, व्हॉट्सअ‍ॅपवरचे चॅट गायब होण्यासाठी 24 तासांची वेळ देण्यात आली आहे. टू स्टेप व्हेरिफिकेशन कंपनीने सांगितलं, की व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुविधा (Whatsapp two step Verification) देण्यात आली आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप उघडण्यासाठी तुम्हाला पिन एंटर करण्याची गरज भासेल. त्यामुळे ते अधिक सुरक्षित झालं आहे. न सांगता सोडा ग्रुप आता तुम्ही कोणालाही कळू न देता एखाद्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून (Whatsapp new features) बाहेर पडू शकता, अशी माहिती कंपनीने दिली आहे. केवळ ग्रुप अ‍ॅडमिनला या गोष्टीची माहिती मिळेल, ग्रुपच्या अन्य सदस्यांना ते दिसणार नाही. स्वतःला करा ब्लॉक एखाद्या स्पॅम किंवा नकोशा नंबरवरून मेसेज आल्यानंतर आता तुम्ही स्वतःला त्यांच्यापासून ब्लॉक करू शकणार आहात. केवळ काही सेकंदांमध्ये हे सेटिंग तुम्ही ऑन करू शकता. अशा प्रकारे कंपनीने आपल्या युझर्सच्या सुरक्षिततेसाठी बरीच फीचर्स उपलब्ध करून दिली आहेत. अर्थात ती कितपत व्यवहार्य आहेत हे आपल्याला लवकरच दिसून येईल.
    First published:

    Tags: Whatsapp

    पुढील बातम्या