Home /News /technology /

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk यांची तीन लग्न आणि 7 मुलं, जाणून घ्या त्यांची Lifestyle

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk यांची तीन लग्न आणि 7 मुलं, जाणून घ्या त्यांची Lifestyle

आतापर्यंत एलन मस्क पाच मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये (Relationship) राहिले आहेत आणि त्यांनी तीन वेळा लग्न केलंय. विशेष म्हणजे त्यांनी एकाच मुलीसोबत दोनदा लग्न केलं आहे.

नवी दिल्ली, 26 मे : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि अमेरिकी कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Tesla CEO Elon Musk) यांचं वैयक्तिक आयुष्य त्यांच्या बिझनेसप्रमाणेच अतिशय रंजक आणि चढ-उतारांनी भरलेले आहे. आतापर्यंत एलन मस्क पाच मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये (Relationship) राहिले आहेत आणि त्यांनी तीन वेळा लग्न केलंय. विशेष म्हणजे त्यांनी एकाच मुलीसोबत दोनदा लग्न केलं आहे. Pagesix डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, एलन मस्क यांना एकूण 7 अपत्ये आहेत. यापैकी सहा मुलं तर एक मुलगी आहे. एलन मस्क यांना त्यांची पहिली पत्नी आणि कॅनेडियन लेखिका जस्टिन विल्सन यांच्यापासून 5 मुले आहेत. विल्सनने एकदा जुळ्या मुलांना जन्म दिला आणि दुसऱ्यांदा तिळ्यांना जन्म दिला. एलन मस्क यांनी मुलांची नावं अतिशय विचित्र ठेवली आहेत. त्यांची मुलगी आणि मुलांची नावं इतकी विचित्र आहेत की पहिल्यांदा ऐकल्यानंतर कोणीही गोंधळून जाईल. पहिल्या पत्नीपासून 6 अपत्यं - एलन मस्क यांनी 2000 मध्ये कॅनेडियन लेखिका जस्टिन विल्सनशी लग्न केलं. 2002 मध्ये या दाम्पत्याला मुलगा झाला. मस्क यांनी आपल्या मुलाचं नाव नैवेडा अलेक्झांडर मस्क ठेवलं. पण, तो 10 आठवड्यांचा झाल्यानंतर त्याला एका गंभीर आजाराने ग्रासलं आणि त्याचा मृत्यू झाला. पहिलं मूल गमावल्यानंतर, एलन मस्क आणि विल्सन यांनी कुटुंब वाढवण्यासाठी आयव्हीएफ (IVF) प्रणालीची मदत घेतली. त्यानंतर विल्सनने 2004 मध्ये ग्रिफिन आणि झेवियर मस्क या जुळ्या (Twins) मुलांना जन्म दिला. ही दोन्ही मुलं आता 18 वर्षांची झाली आहेत. त्यानंतर 2006 मध्ये एलन मस्क आणि विल्सन यांच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला. यावेळीही विल्सनने आयव्हीएफ प्रणालीच्या मदतीने गर्भधारणा केली होती. आणि तिने तिळ्यांना जन्म दिला. एलन मस्क यांनी या मुलांची नावं काई, सॅक्सन आणि डॅमियन मस्क अशी ठेवली. त्यानंतर मस्क यांनी 2008 मध्ये विल्सन यांना घटस्फोट दिला. सध्या मस्क आणि विल्सन यांनी त्यांच्या पाच मुलांची कस्टडी शेअर केली आहे. अभिनेत्री तल्लुलाह रिलेशी केलं 2 वेळा लग्न - जस्टिन विल्सनसोबत घटस्फोट (Divorce) झाल्यानंतर मस्क अमेरिकन अभिनेत्री तल्लुलाह रिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी 2010 मध्ये लग्न केलं. पण, हे नातं फार काळ टिकलं नाही आणि 2012 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर दोघांनी 2013 मध्ये पुन्हा लग्न केलं, परंतु तरीही ते लग्न टिकलं नाही आणि 2016 मध्ये रिले आणि मस्क वेगळे झाले. रिलेपासून वेगळे झाल्यानंतर मस्क काही काळ अभिनेत्री अंबर हर्डसोबत रिलेशनशिपमध्ये होते, असं म्हटलं जातं.

हे वाचा - चीन सोडून भारतात येण्याच्या तयारीत Apple? उत्पादन आणि व्यापाराच्या शक्यतांवर विचार

सिंगर ग्रिम्सशी लग्न न करता 2 मुलं - मस्क यांनी मे 2018 मध्ये गायिका ग्रिम्सला डेट करायला सुरुवात केली. मे 2020 मध्ये, ग्रिम्सने मस्क यांच्या मुलाला जन्म दिला. मस्कने आपल्या मुलाचे नाव X AE A-XII ठेवलं. आता तो दोन वर्षांचा आहे. ग्रिम्स आणि एलन मस्क यांची त्यांच्या मुलाच्या नावावरून सोशल मीडियावर खूप खिल्ली उडवली गेली. दरम्यान, डिसेंबर 2021 मध्ये एलोन मस्कच्या मुलीला जन्म दिल्याचा खुलासा ग्रिम्सने मार्च 2022 मध्ये केला. ग्रिम्सने व्हॅनिटी फेअर मॅगझिनद्वारे एलन मस्कच्या मुलीच्या जन्माची माहिती दिली. विशेष म्हणजे 2-3 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. मस्क आणि ग्रिम्स यांनी त्यांच्या मुलीचं नाव Exa Dark Sideræl ठेवलं आहे आणि तिला Y असं निकनेम दिलंय.
First published:

Tags: Elon musk, Lifestyle, Personal life, Tesla

पुढील बातम्या