नवी दिल्ली, 17 एप्रिल : उन्हाळा सुरू झाला की घरातील अनेक उपकरणे सुरू होतात. उकाड्यापासून हैराण झालेले लोक मग पंख्यापासून कूलरपर्यंत सगळ्याच गोष्टी चालू करतात. परिणामी उन्हाळ्यात इतर महिन्याच्या तुलनेत वीजबिल जास्त येते. दुसरीकडे पुरेसे व्होल्टेज असूनही पंखे योग्य प्रकारे हवा देत नाहीत, हे उन्हाळ्याच्या सुरुवातीला सामान्य आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचा पंखा कमी हवा देतो आणि पॉवर युनिट्स तितकेच खर्च होत आहेत, तर फॅनकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला आपण एसी ठीक करतो, पण कुलर, पंखे याकडे लक्ष देत नाही. आज आम्ही तुम्हाला अशी एक युक्ती सांगणार आहोत, ज्यामुळे एका मिनिटात फॅन-कूलरचा वेग वाढेल आणि वीज बिलही कमी होईल. हे काम सर्वात प्रभावी अनेक महिन्यानंतर पंखा चालू केल्यानंतर, पंखा नीट हवा देत नाही असे वाटत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला इलेक्ट्रिशियनला कॉल करण्याची गरज नाही किंवा नवीन पंखा घेण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एक छोटीशी गोष्ट करायची आहे, ज्यामुळे पंख्याचा वेग स्वतःच वाढेल. इतकंच नाही तर वेग वाढला की वीज बिलही कमी होईल. Android फोनसाठी Google ने बंद केलं हे फीचर, आता कधीच वापरता येणार नाही ब्लेडमध्ये धूळ साचते तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पंख्याच्या ब्लेडमुळे हवा कापली जाते आणि त्यामुळे धूळ आणि मातीचे कण ब्लेडच्या तीक्ष्ण भागात जमा होतात, त्यामुळे पंखा जास्त लोड घेऊ लागतो. वेग मंदावतो आणि पंख्याची मोटर जास्त लोड घेऊ लागते, त्यामुळे वीज बिल जास्त येते. मग तो छताचा पंखा असो, टेबल फॅन असो, कुलर असो की एसी. हे तत्व सर्वांना लागू होते. पंख्याचे ब्लेड ओल्या कापडाने स्वच्छ करा पंख्याचा वेग वाढवण्यासाठी इलेक्ट्रिशियनला कॉल करण्याची गरज नाही. तुम्ही ते स्वतःच दुरुस्त करू शकता. तुम्हाला फक्त पंख्याचे ब्लेड ओल्या कापडाने स्वच्छ करायचे आहेत. परंतु, जास्त जोराने ब्लेड साफ न करण्याची काळजी घ्या, कारण यामुळे अलाइनमेंट खराब होऊ शकते. हळूवारपणे ब्लेड काळजीपूर्वक स्वच्छ करा. पंखा साफ केल्यानंतर तो चालू करून पाहिल्यास पंखा वेगाने धावू लागतो. तसेच, त्याचा आवाजही कमी होईल. यामुळे पंख्याची मोटार कमी लोड घेईल आणि वीज बिलावर फारसा परिणाम होणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.