मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Digilockerमध्ये तुमची डॉक्युमेंट्स राहतील एकदम सुरक्षित, ती कशी अपलोड करायची? वाचा सविस्तर

Digilockerमध्ये तुमची डॉक्युमेंट्स राहतील एकदम सुरक्षित, ती कशी अपलोड करायची? वाचा सविस्तर

Digilockerमध्ये तुमची डॉक्युमेंट्स राहतील एकदम सुरक्षित, ती कशी अपलोड करायची? वाचा सविस्तर

Digilockerमध्ये तुमची डॉक्युमेंट्स राहतील एकदम सुरक्षित, ती कशी अपलोड करायची? वाचा सविस्तर

आपण आपली डॉक्युमेट्स पीडीएफ फाईल्सच्या रुपात क्लाउडवर सेव्ह करतो. अशीच एक सरकारी सेवा उपलब्ध आहे. DigiLocker ही डॉक्युमेंट्स क्लाउड स्टोरेज सर्व्हिस आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 5 डिसेंबर: आपण आपली डॉक्युमेट्स पीडीएफ फाईल्सच्या रुपात क्लाउडवर सेव्ह करतो. अशीच एक सरकारी सेवा उपलब्ध आहे. DigiLocker ही डॉक्युमेंट्स क्लाउड स्टोरेज सर्व्हिस आहे. ती डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (DIC) अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाद्वारे जारी केलेल्या डॉक्युमेंट्ससाठी वापरली जाते. ती ओळख प्रक्रियेसाठी तुमचं आधार कार्ड वापरते. इथे तुम्ही तुमची कागदपत्रं डिजिटल स्वरूपात स्टोअर करू शकता आणि कधीही वापरू शकता. फक्त त्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असणं आवश्यक आहे. ही डिजिटल कागदपत्रं गरज असेल तिथं तुम्ही डिजिटली शेअर करू शकता किंवा फोनमध्ये दाखवू शकता. ती कागदपत्रं ओरिजनल मानली जातात आणि रेल्वे, वाहतूक पोलीस आणि पासपोर्ट सर्व्हिसेसमध्ये वैध घोषित करण्यात आली आहेत. आता डिजीलॉकरमध्‍ये तुमची कागदपत्रं कशी अपलोड करता येतील, ते जाणून घेऊयात.

    डिजीलॉकरमध्ये जारी केलेलं तसंच अपलोड केलेलं डॉक्युमेंट असू शकतं. जारी केलेले दस्तऐवज हे ई-दस्तऐवज आहेत, जे सरकारी एजन्सीद्वारे एखाद्या व्यक्तीला ओरिजनल सोर्सेसकडून थेट दिले जातात. जारी केलेल्या दस्तऐवज विभागात ही कागदपत्रं issued documents section मध्ये URL प्रमाणे ठेवली जातात. uploaded documents युजरने अपलोड केलेले असतात. यामध्ये 10MB पर्यंत साईजच्या pdf, .jpeg आणि .png फाईल्स असू शकतात.

    डिजिलॉकरमध्ये डॉक्युमेंट्स कशी अपलोड करायची?

    - सर्वांत आधी DigiLocker वेबसाइटवर जा आणि उजव्या वरच्या कोपऱ्यात साईन-अप वर क्लिक करा.

    - आता तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि आधार क्रमांक टाकण्यास सांगितलं जाईल.

    - तुम्हाला 6 अंकी पिनदेखील सेट करावा लागेल, जो तुमचा पासवर्ड असेल.

    - त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावं लागेल.

    हेही वाचा: Super Bikeला दोन सायलेन्सर का बसवले जातात? वाचा इंटरेस्टिंग कारण

    - त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.

    - OTP भरल्यानंतर तुम्हाला Submit वर क्लिक करावं लागेल.

    - यानंतर तुम्हाला युजरनेम टाकण्यास सांगितलं जाईल.

    - ते भरल्यानंतर तुम्ही Submit वर क्लिक केलं की तुमचं अकाउंट उघडेल.

    - आता तुम्हाला डिजिलॉकर होमपेज दिसेल.

    - इथं तुम्हाला पेजच्या डाव्या बाजूला असलेल्या Uploaded Documents वर क्लिक करावं लागेल.

    - नंतर Upload वर क्लिक करा.

    - तुम्हाला कम्प्युटरवरून जी फाइल अपलोड करायची आहे ती सिलेक्ट करा आणि नंतर ओपन वर क्लिक करा. तुम्ही एकापेक्षा जास्त फाइल्सदेखील निवडू शकता.

    - आता ती फाईल तुम्हाला Uploaded Documents sectionमध्ये दिसेल.

    - तुम्ही अपलोड केलेल्या फाइलसाठी document type देखील निवडू शकता. फाइलच्या पुढे तुम्हाला Select Doc Type निवडा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा आणि ते तुम्हाला electricity bill, dependency certificate, integrated certificate, identification certificate आणि बऱ्याच ऑप्शनची यादी दाखवेल.

    अ‍ॅपवरून डिजिलॉकरवर डॉक्युमेंट्स कशी अपलोड करायची?

    - DigiLocker अ‍ॅपमध्ये साइन इन करा.

    - डॅशबोर्डवरील वरच्या डाव्या burger menu वर क्लिक करा.

    - Upload Documents सिलेक्ट करा.

    - आता मेनू बटणाच्या वर असलेल्या upload button वर क्लिक करा.

    - तुम्हाला आता तुमच्या फाइल्ससाठी अ‍ॅपला परवानगी देण्यास सांगितलं जाईल.

    - आता इतर अ‍ॅप्समधून तुम्हाला अपलोड करायची असेल ती फाईल किंवा कंटेंट सिलेक्ट करू शकता.

    - फाइल्स निवडल्यानंतर तुम्ही अ‍ॅपद्वारेच तुमच्या फोनच्या स्टोरेजमध्ये जाता. तिथून तुम्ही फाइल शोधा, निवडा आणि नंतर अपलोड वर क्लिक करा.

    - दुसऱ्या अ‍ॅपचा कंटेंट तुमच्या फोनची डीफॉल्ट ब्राउझर फाइल उघडतो.

    अशा रितीने तुम्ही तुमची डॉक्युमेंट्स डिजिलॉकरवर अपलोड करू शकता.

    First published:

    Tags: Digital services