मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /ऑनलाइन गेमिंगमधून पैसे मिळवत असाल तर सावधान; आयकर विभागाची तुमच्यावर करडी नजर

ऑनलाइन गेमिंगमधून पैसे मिळवत असाल तर सावधान; आयकर विभागाची तुमच्यावर करडी नजर

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सध्या ऑनलाइन गेमिंगद्वारे (Online Gaming) पैसे कमवणाऱ्या व्यक्तींना आयकर विभागाकडून नोटिसा पाठवल्या जात आहेत. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून ज्यांनी पैसे मिळवले अशांची माहिती गोळा केली जात आहे

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई 02 सप्टेंबर : ऑनलाइन गेमिंगचे (Online Gaming) फॅड सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लहान मुलांसह तरुणाईही याच्या जाळ्यात ओढली जात आहे. ऑनलाइन गेम खेळून पैसे कमावणाऱ्यांची संख्याही बरीच दिसते. पण या माध्यमातून पैसे मिळवत असाल तर तुमच्यावर आयकर विभागाची (Income Tax) करडी नजर असू शकते. बहुतांशी जण ऑनलाइन गेमिंगद्वारे पैसे कमावत आहेत; पण कर भरत नसल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे. ‘जागरण हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

  मागील तीन आर्थिक वर्षांत ऑनलाइन गेमिंग चालवणाऱ्या एका पोर्टलने गेम जिंकणाऱ्या विजेत्यांना 58,000 कोटी रुपयांची रक्कम बक्षीस स्वरूपात दिली आहे. पण एकाही विजेत्याने मिळवलेल्या पैशातून कर भरला नसल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT-Central Board Of Direct Taxation) म्हटलं आहे. सध्या ऑनलाइन गेमिंगद्वारे पैसे कमवणाऱ्या व्यक्तींना आयकर विभागाकडून नोटिसा पाठवल्या जात आहेत. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून ज्यांनी पैसे मिळवले अशांची माहिती गोळा करण्यासाठी विभागाने कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केलाय. अशा प्रकारची कमाई करणाऱ्यांना रिव्हाईज्ड रिर्टन भरावा लागेल.

  WhatsApp ग्रुप अ‍ॅडमिन असाल तर 'या' 5 चुका करू नका, नाहीतर खावी लागेल जेलची हवा

  नियमांनुसार मिळवलेल्या रकमेवर 30 टक्के कर भरावा लागतो. दुसरीकडे कर सल्लागार मात्र ऑनलाइन गेमिंगवर लागणाऱ्या कर पद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. ऑनलाइन गेमिंग कौशल्याचा खेळ (Skill Game) आहे की संधीचा हे ठरवल्यानंतरच यावर कर निश्चित करता येईल. ऑनलाइन गेमिंगची व्याख्या अजून स्पष्ट झालेली नसल्याचंही तज्ज्ञ सांगतात. दरम्यान, ऑनलाइन गेमिंगमध्ये चीननंतर भारताचा क्रमांक येतो.

  गेम खेळणाऱ्यांसाठी केवायसी अनिवार्य नाही

  ऑनलाइन गेमिंगसाठी सध्या केवायसी अनिवार्य नाही. ऑनलाइन गेमिंग संदर्भात टीव्हीवर ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्यातही हा गेम खेळणं आर्थिकदृष्ट्या जोखमीचं ठरू शकतं, असा इशारा दिला जातो. दरम्यान, आर्थिक जोखीम तर शेअर बाजारातही असते. तिथंही अल्पकाळात मिळणाऱ्या लाभावर 15 टक्केपर्यंत कर भरावा लागतो.

  बनारसमध्ये लोक गुपचूप 'या' गोष्टी करतायत सर्च, Google Search रिपोर्टमुळे सर्वांनाच धक्का

  लॉटरीवर 30 टक्क्यांपर्यंत कर

  सध्या लॉटरीवर 30 टक्क्यांपर्यंत कर लागतो. ज्या व्यक्तीला लॉटरी लागते तिला 30 टक्के कर वजा करून उर्वरित रक्कम दिली जाते. तर ऑनलाइन गेम कौशल्यात सामील आहे. अशा स्थितीत एखादी व्यक्ती टॅक्स रिटर्नमध्ये ऑनलाइन गेमिंगमधून मिळणाऱ्या कमाईचा इतर स्रोतातून होणाऱ्या उत्पन्नाच्या श्रेणीत समावेश करू शकते. दरम्यान, या सर्व बाबींवर सरकारकडून स्पष्टीकरण दिलं जाणं अत्यावश्यक असल्याचं तज्ज्ञांना वाटतं.

  असा आहे ऑनलाइन गेमिंगचा व्यवसाय

  सर्वच ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून कमाई होत नाही. परंतु, अनेक गेमिंग प्लॅटफॉर्म बिनदिक्कतपणे कमाई करत आहेत. ऑनलाइन गेमिंगमधून होणाऱ्या कमाईला बेटिंग (Betting) मानलं गेलं तर बेटिंगवर 30 टक्के कर लागत असल्याचं एससी लीगल सॉलिसिटर्स अँड अॅडव्होकेट्स फर्मचे संस्थापक आणि चार्टर्ड अकाउंटंट असीम चावला यांनी सांगितलं. पण याला कौशल्य समजलं गेलं आणि त्याद्वारे कमाई झाल्यास त्यावर लागणारा कर वेगळा असू शकतो. दरम्यान ऑनलाइन गेमिंगचा व्यवसाय देशात सध्या 2.5 अब्ज डॉलरचा आहे.

  First published:
  top videos

   Tags: Game