Home /News /technology /

मुख्यमंत्र्यांच्या मुलीची online फसवणूक करणारे चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात; काय झालं होतं नेमकं?

मुख्यमंत्र्यांच्या मुलीची online फसवणूक करणारे चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात; काय झालं होतं नेमकं?

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीची OLX वर ऑनलाइन सोफा विकताना फसवणूक झाली होती. पोलिसांनी त्यांना जेरबंद केलं आहे. लुटारू टोळीचे (cyber criminal gang) तब्बल 17 अकाउंट्स असल्याचं स्पष्ट झालं. तुम्हीही वाचा काय झालं होतं नेमकं? ऑनलाइन व्यवहार करताना काय टाळायचं ते..

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : सायबरचोर (cyber crime) कधी कुणाला आपला निशाणा बनवतील सांगता येत नाही. कधी दिल्लीचे पोलीस आयुक्त तर कधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची मुलगी सायबर चोरांच्या जाळ्यात फसतात. मात्र पोलिसांनी (Delhi Police) शिताफीने त्यांच्यावर जाळं टाकत हर्षिता केजरीवाल (Harshita Kejariwal)यांची ऑनलाइन फसवणूक करणाऱअयांना पकडलं आहे. नेमकं काय घडलं? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी (daughter of Arvind Kejriwal) हर्षितानं (Harshita Kejriwal) गेल्या रविवारी दिल्ली पोलिसांकडं तक्रार (complaint) दिली. तक्रारीत सांगितलं, की तिनं ओएलएक्सवर (OLX) सोफा-कम्प्युटर आणि टेबल विकण्याची जाहिरात दिली होती. हर्षिता स्वतः आयआयटी इंजिनियर (IIT Engineer) आहे. उत्तर दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स ठाण्यात (Delhi civil lines police station) केस नोंदवली गेली. सब इन्स्पेक्टर रोहित संड यांच्याकडे केस ट्रान्स्फर केली गेली. एका सायबरतज्ज्ञ पोलिसानं (cyber expert policeman) या आरोपीचा माग (investigated and caught the accused) अगदी नीटपणे काढला आहे. TV9 नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. झालेल्या घटनाक्रमानुसार, तक्रारीनुसार हर्षितानं जाहिरात दिली तेव्हा काही वेळातच तिच्याकडे एक कॉल आला. फोन करणाऱ्यानं आपलं नाव राघवेंद्र सिंह असं सांगितलं. त्यानं हर्षितासोबत 21 हजार रुपयात सौदा ठरवला. सोबतच पैसे ऑनलाईन देण्याबाबतही तो बोलला. या संवादादरम्यानच आरोपी हर्षिताला म्हणाला, की तो तिच्या अकाउंटमध्ये टेस्टसाठी 2 रुपये पेटीएमद्वारे टाकतो आहे. दोन रुपये हर्षिताला मिळाल्यावर आरोपीनं तिला बार कोड स्कॅन करायला सांगितला. धक्कादायक गोष्ट ही, बार कोड स्कॅन करताच हर्षिताच्या खात्यातून 20 हजार रुपये एकाएकी गायब झाले. हे विचारताच तो आरोपी हर्षिताला म्हणाला, की ऑनलाईन देवाणघेवाणीत बँक खात्यात काही अडचण येते आहे. यासाठी हर्षितानं गुगल पेच्या माध्यमातून पेमेंट घ्यावं. सोबतच आरोपी म्हणाला, की 21 हजार रुपयांव्यतिरिक्त तो पूर्वी त्याच्याकडे चुकून आलेले 20 हजार रुपयेही Google pay पेद्वारेच वापस देईल. मात्र या आरोपीनं पुन्हा एकदा तेच कृत्य केलं. पुन्हा 14 हजार रुपये ऑनलाईन काढून घेतले. यानंतर हर्षितानं आरोपीच्या मोबाईलवर कॉल केला तेव्हा तो बहाणे सांगायला लागला. तिनं पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपी फोनच उचलत नव्हता. तेव्हा हर्षिताला समजलं, की तिची सायबर फसवणूक झाली आहे. मग तिनं पोलिसात तक्रार दाखल केली. हे प्रकरण होतं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीसोबत झालेल्या सायबर फसवणुकीचं. त्यामुळे लगोलग उत्तर दिल्लीचे डीसीपी अँटो अल्फोन्स यांनी तपास जिल्हा सायबर सेलचे प्रमुख (cyber cell chief) रोहित संडकडे पाठवली. डीसीपीनं रोहित संड यांच्या नेतृत्वात सिव्हिल लाईन्स ठाण्याचे सब-इन्स्पेक्टर रोहित, सहायक उप-निरीक्षक राजीव आणि शिपाई प्रकाश आणि अनिल यांच्या टीम्स बनवल्या. याबाबत पोलिसांनी 7 फेब्रुवारीलाच केस नोंदवून घेतली होती. हेही वाचाटूल किटचं महाराष्ट्र कनेक्शन : ट्वीटच्या तपासात बीडपर्यंत पोहोचले पोलीस पोलिसांनी सायबर सेलकडून (cyber cell) मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारावर भरतपूर-मथुरा बॉर्डरवरून आरोपींना पकडलं. आरोपीनं आपलं नाव कपिल कुमार राजोरीया असं सांगितलं. हे नाव खोटं असल्याचंही तपासात समोर आलं. नंतर त्यानं सांगितल्यानुसार पोलिसांनी खरा बँक खातेधारक असलेल्या साजिदलाही जेरबंद केलं. साजिद पोलिसांच्या हाती लागला तेव्हा तो एक जुनी कॅब चालवत होता. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत कपिलनं कबूल केलं, की त्याचं अकाउंट मानवेंद्र नावाच्या एका व्यक्तीनं उघडलं होतं. नंतर पोलिसांनी साजिद आणि कपिलसोबतच मुळच्या मथुरेच्या असलेल्या मानवेंद्रलाही पकडलं. या सायबर लुटारू टोळीचे (cyber criminal gang) तब्बल 17 अकाउंट्स असल्याचं पोलिसांना कळालं आहे. या अकाउंट्सना आता गोठवण्यात आलं आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, साजिदचे एकट्यानेच 7 बँक अकाउंट्स आहेत. सायबर चोरांकडून जप्त केलेलं सीम (sim card) आसामचं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Arvind kejriwal, Cyber crime, Police investigation

    पुढील बातम्या