Home /News /maharashtra /

Google tool Kit चं महाराष्ट्र कनेक्शन : ग्रेटा थनबर्ग ट्वीटच्या तपासात बीडपर्यंत पोहोचले पोलीस

Google tool Kit चं महाराष्ट्र कनेक्शन : ग्रेटा थनबर्ग ट्वीटच्या तपासात बीडपर्यंत पोहोचले पोलीस

शेतकरी आंदोलनात वापरलेल्या Google tookit प्रकरणी रविवारी बंगळुरूच्या पर्यावरण कार्यकर्तीला पोलिसांनी ताब्यात घेतनंतर आता याचं महाराष्ट्र कनेक्शनही उघड झालं आहे. बीडच्या शंतनु मुळीकच्या दिल्ली पोलीस तपास करत आहेत.

बीड/नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : दिल्लीत प्रजासत्ताक दिनी (Republic Day farmers protest) शेतकरी आंदोलनात हिंसाचार झाला आणि त्याची चौकशी करताना Google tool kit  प्रकरण उघड झालं. आंतरराष्ट्रीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग (Greta thunberg )हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारं आणि नंतर डिलीट केलेलं ट्वीट (Greta Thunberg toolkit) आता तपासाच्या केंद्रस्थानी आहे. दिल्ली पोलिसांची विशेष टीम या Google Toolkit मध्ये कुणी फेरफार केले आणि ते मुळात कुणी तयार केलं? देशविरोधी प्रचार मुद्दाम कुणी केला याचा शोध घेत आहेत.  या प्रकरणी रविवारी बंगळुरूची एक तरुण कार्यकर्ती पोलिसांच्या ताब्यात गेल्यानंतर आता याचं महाराष्ट्र कनेक्शनही उघड झालं आहे. शंतनु मुळूक नावाचा एका तरुण कार्य़कर्त्याचं नाव पोलिसांनी जाहीर केलं आहे. यानेच Google Tool kit तयार केली आणि इतर दोघांनी ती एडिट केली, असा पोलिसांचा दावा आहे. टूल किट प्रकरणातील हा संशयित शंतनू मुळूक बीडचा रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. दिल्ली पोलिसांनी बीड मधील त्याच्या राहत्या घरी चौकशीही सुरू केली आहे. ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) टूलकिट (Toolkit) प्रकरणात पोलिसांनी बंगळुरू येथून दिशा रवीला (Disha Ravi) शनिवारी अटक केली. या अटकेनंतर दिल्ली न्यायालयानं सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील निकिता जेकब(Nikita Jacob) विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. ग्रेट थनबर्गनं सोशल मीडियावर शेअर केलेलं टूलकिट बनवण्यात निकिताचाही हात असल्याचं म्हटलं जात आहे. ही निकिता जेकब मुंबईत वकील म्हणून काम करते. तिने अटकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी याचिकाही दाखल केली आहे. आता महाराष्ट्रातलं दुसरं नाव या प्रकरणी पुढे आलं आहे. ते नाव आहे शंतनु मुळूक शेतकरी आंदोलना दरम्यान टूल किटचं प्रकरण समोर आलं आणि यामध्ये बीड शहरातील  शंतनु शिवलाल मुळूक या तरुणावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आला. दिल्ली पोलिसनी शंतनुच्या घराची झाडाझडती घेतली असून त्याच्या आई वडिलांची चौकशी केली. शंतनू अद्याप फरार आहे. त्याच्या बँकेत जाऊन देखील खात्याचा तपशील पोलिसांनी घेतला आहे. कुटुंबीयांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावत नाहक आमची बदनामी केली जात असल्याचा दावा केला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणूनच हा गुन्हा दाखल केला जात असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. कोण आहे शंतनु मुळूक? बीड शहरातील चाणक्यपुरी भागात राहणाऱ्या शिवलाल मुळूक यांचा मोठा मुलगा आहे. शंतनु हा इंजिनीअर आहे. BE Mechanical engieneering त्याने केलं आहे. शिवाय अमेरिकेत MS ची पदवी घेतली असून तो पर्यावरण संवर्धना संदर्भात राष्ट्रीय पातळीवर काम करतो. शंतनूबद्दल बोलताना त्याची आई हेमलता मुळूक म्हणाल्या, "शेतकरीऱ्यांसंदर्भात त्याला तळमळ आहे. म्हणून शेतकरी आंदोलनाला सोशल मीडियच्या माध्यमातून तो पाठिंबा देत होता. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मी शेतकऱ्याची मुलगी म्हणून माझा देखील पाठिंबा आहे. मात्र त्यामुळे आमची चौकशी केली जातेय. शंतनूचं आणि आमचं 8 दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं. पुन्हा बोलणं झालं नाही म्हणून चिंता वाटतेय." तर शँतनू हा इथेच राहतो औरंगाबाद मध्ये जॉब करत होता पुण्यात नव्यने काही सुरू करावे म्ह्णून गेला होता. आठ दिवसा पूर्वी त्याच माझं बोलणं झालं त्यानंतर काहीच बोलत नाही झालं. दोन दिवसा पासून दिल्ली पोलीस चे दोन अधिकारी आमची चौकशी करत आहेत. त्यांना आम्ही सहकार्य करत आहोत. शँतनू पर्यावरणा संदर्भात काम करतो. शेतकरी आंदोलना संदर्भात माहिती विचारात होता. आत्ता कुठे माहिती नाही अशी माहिती शँतनू चे वडील शिवलाल मुळूक यांनी दिली. कोण आहे मुंबईतील निकिता जेकब? टूलकिट प्रकरणात दिशा रवीनंतर पोलीस घेतायेत शोध शेतकरी आंदोलना संदर्भात  प्रसिद्ध झालेल्या बातमी, माहिती आणि लिंक एकत्रित करून  टूल किट बनवली आंदोलनाला साह्य व्हावे यासाठी  कृषी कायदे व आंदोलनाची माहिती त्यात दिली जात होती इतर माहिती 16,17 जानेवारी ला ते पब्लिश केले.शेतकरी आंदोनला जागतिक स्तरावरून पाठींबा मिळवण्यासाठीकाम केलं शँतनू आणि त्याचे सहकारी हे एकत्रित येऊन पर्यावरण वाचवणारी चळवळ पुढे नेत होते शेतकरी आंदोलनाला जागतिक स्तरावर पाठींबा मिळवण्यासाठी यांनि ग्रेटा तणबर्ग चाविडिओ मागितला होता.. शेतकरी आंदोलना ला पाठींबा दिला म्हणून कारवाई करणं चुकीचं आहे. नाहक कुटुंबाची बदनामी केली जातेय असा आरोप शँतनू चे चुलतभाऊ सचिन मुळूक यांनी केला आहे शिवसेनेचा शंतनुला पाठिंबा शंतनूवर कारवाई केली जात आहे त्याचा निषेध शिवसेनेने केला आहे. सेनेचे बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी News18lokmat शी बोलताना सांगितलं की, 'शेतकरी आंदोलनात सहभागी झाले म्हणून देशद्रोहाचे गुन्हे दाखल होत असतील तर सर्व शेतकरी देशद्रोही आहेत, असं केंद्र सरकारने सांगावं." काँग्रेसचे प्रवक्ते दादासाहेब मुंडे यांनीही शंतनुची बाजू उचलून धरली आहे. शंतनुवर जी कारवाई केली जातेय त्याचा निषेध करतो. आम्ही सर्व जण शंतनुच्या पाठीशी आहोत, असं दादासाहेब मुंडे यांनी सांगितलं.
First published:

Tags: Beed, Delhi, Farmers proete, Greta Thunberg

पुढील बातम्या