मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /'या' देशात कोविड-19 व्हायरस पासपोर्ट लाँच; ही सुविधा देणारा ठरला पहिलाच देश

'या' देशात कोविड-19 व्हायरस पासपोर्ट लाँच; ही सुविधा देणारा ठरला पहिलाच देश

वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा प्रवासासाठी कर्ज घेणं कधीच चांगलं नसतं. आर्थिक तज्ज्ञांच्या मते शिक्षण आणि गृह कर्ज घेणं चांगलं कर्ज मानलं जातं.

वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा प्रवासासाठी कर्ज घेणं कधीच चांगलं नसतं. आर्थिक तज्ज्ञांच्या मते शिक्षण आणि गृह कर्ज घेणं चांगलं कर्ज मानलं जातं.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरता चीनने कोविड 19 व्हायरस पासपोर्ट (Covid-19 Virus Passport) लाँच केला आहे. असा पासपोर्ट लाँच करणारा चीन हा पहिला देश ठरला आहे.

    बिजिंग, 11 मार्च : गेल्या एक वर्षापासून कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) आंतरराष्ट्रीय विमान प्रवास आणि पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. अद्यापही काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक जवळपास बंदच आहे. कोरोनानंतर जगात अनेक गोष्टींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. अर्थात त्यात आंतरराष्ट्रीय प्रवास आणि पर्यटनाचाही समावेश होईल. त्या अनुषंगाने अनेक देशांनी पावलं उचलण्यास प्रारंभ केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरता चीनने कोविड 19 व्हायरस पासपोर्ट (Covid-19 Virus Passport) लाँच केला आहे. असा पासपोर्ट लाँच करणारा चीन हा पहिला देश ठरला आहे.

    चीनने आंतरराष्ट्रीय चिनी प्रवाश्यांकरता आरोग्य प्रमाणपत्र कार्यक्रम (Health certificate Programme) सुरू केला आहे. जगभरातील अनेक देश व्हायरस पासपोर्टसारखं कागदपत्र लाँच करण्याच्या प्रयत्नात असताना चीनने मात्र यात आघाडी घेतली आहे. युजर्सची लसीकरणाची स्थिती, व्हायरस टेस्टचा रिझल्ट दर्शवणारे हे डिजीटल प्रमाणपत्र चिनी नागरिकांसाठी चिनी सोशल मिडीया प्लॅटफार्म असलेल्या WeChat वर सोमवारी झालेल्या कार्यक्रमात लाँच करण्यात आलं. ही सुविधा केवळ चिनी नागरिकांसाठी उपलब्ध असेल.

    याबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं की जागतिक अर्थिक रिकव्हरी आणि सीमापार प्रवास सुलभ व्हावा, यासाठी हे प्रमाणपत्र तयार केलं जात आहे.

    (वाचा - जगातील सर्वांत मोठी स्कूटर फॅक्टरी; प्रत्येक दुसऱ्या सेकंदाला तयार होणार एक गाडी)

    हे प्रमाणपत्र चीनमध्ये आणि चीनबाहेर प्रवास करण्यासाठी असले तरी ते सध्या केवळ चिनी नागरिकांसाठीच आहे. मात्र हे प्रमाणपत्र बंधनकारक नाही. चिनी प्रवासी परदेशात गेल्यावर त्या देशातही याचा वापर केला जाऊ शकतो का याचे कोणतेही संकेत संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेले नाहीत. हे प्रमाणपत्र प्रिंटआउट स्वरुपातही उपलब्ध असून हा जगातील पहिला व्हायरस पासपोर्ट असल्याचं मानलं जातं. अमेरिका (America) आणि ब्रिटन (Britain) अशा प्रकारच्या परमिट अंमलबजावणीच्या विचारात आहेत. युरोपियन युनियन (European Union) देखील अशा प्रकारच्या ग्रीन पासवर (Green Pass) काम करत असून याआधारे नागरिकांना सदस्य देशात आणि परदेशात प्रवास करणं शक्य होईल.

    चीनच्या या पासपोर्टमध्ये एक एन्क्रिप्टेड क्यूआर कोड असून त्यामुळे प्रवाश्यांच्या आरोग्याची माहिती मिळेल, असं चिनी वृत्तसंस्था सिन्हुआने सोमवारी दिली. चीनमध्ये देशातंर्गत वाहतूक आणि सार्वजनिक स्थळी जाण्यासाठी WeChat आणि अन्य चिनी स्मार्टफोन अ‍ॅप्समधील क्युआर हेल्थ कोड हा बंधनकारक करण्यात आला आहे.

    (वाचा - चीनवर वार करायला भारत सज्ज; सायबर हल्ले रोखण्यासाठी घेतला मोठा निर्णय)

    या अ‍ॅप्सच्या माध्यमातून युजर्सचं लोकेशन ट्रॅकिंग (Location Tracing) केलं जातं. युजर्सचा कोरोनाबाधितांशी जवळून संपर्क आला नसेल, किंवा तो विषाणू असलेल्या हॉटस्पॉट (Hotspot) भागात गेला नसेल, तर युजर्सचं आरोग्य चांगलं आहे, असं मानून ग्रीन कोड तयार होतो.

    परंतु या यंत्रणेमुळे गोपनियतेबद्दल चिंता व्यक्त होत आहे. तसंच यामुळे सरकारी पाळत ठेवण्यास प्रोत्साहन मिळेल अशी भिती देखील व्यक्त होत आहे.

    First published:

    Tags: China, Coronavirus