मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सावधान! फेक ऑक्सिमीटर App वापरणं ठरू शकतं धोकादायक

सावधान! फेक ऑक्सिमीटर App वापरणं ठरू शकतं धोकादायक

Coronavirus च्या काळात ऑक्सिजन लेव्हल मोजणं आवश्यक आहे, पण ऑक्सिजन मोजणारं कुठलंही मोबाईल ॲप डाउनलोड करण्यापूर्वी आधी हे वाचा. अन्यथा तुमच्या फिंगरप्रिंट्स आणि इतर माहितीची होऊ शकते चोरी.

Coronavirus च्या काळात ऑक्सिजन लेव्हल मोजणं आवश्यक आहे, पण ऑक्सिजन मोजणारं कुठलंही मोबाईल ॲप डाउनलोड करण्यापूर्वी आधी हे वाचा. अन्यथा तुमच्या फिंगरप्रिंट्स आणि इतर माहितीची होऊ शकते चोरी.

Coronavirus च्या काळात ऑक्सिजन लेव्हल मोजणं आवश्यक आहे, पण ऑक्सिजन मोजणारं कुठलंही मोबाईल ॲप डाउनलोड करण्यापूर्वी आधी हे वाचा. अन्यथा तुमच्या फिंगरप्रिंट्स आणि इतर माहितीची होऊ शकते चोरी.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : Coronavirus चा वाढता संसर्ग पाहता काही गोष्टी आपल्या आयुष्यात नव्याने सामील झाल्या आहेत. मास्क, सॅनिटायझर याच्याबरोबरीने घराघरात ऑक्सिजन लेव्हल तपासण्यासाठी ऑक्सिमीटर येऊ लागले आहेत. Oximeter App परण्यापूर्वी मात्र हे वाचा. कागी फेक ऑक्सिमीटर अॅप्स तुमच्या अंगठ्याचे ठसे तसंच मोबाइलवरची इतर माहिती चोरू शकतात.

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम याबाबत सध्या दिवसभर सर्वत्र चर्चा होत असते. काय करावे काय करू नये याबाबत मात्र नागरिकांनी जागृत राहणं अत्यंत गरजेचं आहे. रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी ऑक्सिमीटरची आवश्यकता अनेकांना भासते. मग आपल्याला ऑक्सिमीटरच्या ॲपची जाहिरात दिसते आणि आपण ते मोबाइलवर डाउनलोड करतो. पण या ॲपपासून सावध राहा त्याच्या माध्यमातून तुमची फिंगरप्रिंट्स आणि इतर डेटा चोरून मोठा घोटाळा होऊ शकतो.

केंद्रीय गृहमंत्रालयाने सायबर हायजीन या विषयावरील Twitter प्रोफाईल द्वारे या धोक्याविषयी लिहून लोकांनी त्यांच्या फोनमध्‍ये असे ॲप डाऊनलोड करू नये, असं आवाहन केलं आहे. सध्या सर्वत्र कोरोनाची भीती असल्याचं चित्र आहे. याच भीतीचा काही लोक इतरांना लुबाडण्यासाठीही वापर करतात. शिवाय ऑनलाईन गंडवण्याचे अनेक प्रकार पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाकडे दररोज नोंदवले जात आहेत.

आपल्या मोबाइलवर ती सोयच नाही

ऑक्सिमीटरच्या संदर्भातील तथ्यं ,योग्य माहिती प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजण्‍याऱ्या ऑक्सिमीटरमध्ये SpO2  हा सेन्सर असावा लागतो. त्याशिवाय ऑक्सिजनची पातळी मोजताच येत नाही. तसंच हृदयाचे ठोके मोजण्‍यासाठी  हार्टबिट सेन्सरची गरज असते. सध्या भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही फोनमध्ये SpO2 आणि हार्टबिट सेन्सर बसवलेला नाही. त्यामुळे त्या मोबाइलवर कुठलंही App डाउनलोड केलं तरीही ऑक्सिजनचं प्रमाण आणि हृदयाचे ठोके मोजणं शक्यच नाही.  त्यामुळे कोणतेही ॲप तुम्हाला ऑक्सिजनची पातळी किंवा ह्दयाचे ठोके मोजून देण्याचा दावा करत असेल तर तो चुकीचा आहे. कारण त्यातून तुम्हाला अचूक निदान करता येणे अशक्य आहे. आणि ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.  त्यामुळे ऑक्सिजनची पातळी मोजण्याची गरज असेल तर मेडिकलच्या दुकानातून किंवा त्यासंबंधी वेबसाइटवून थेट ऑक्सिमीटर खरेदी करा, असे आवाहन करण्यात आलं आहे.

ऑक्सिमीटर अँप वगैरेच्या माध्यमातून भारतीय नागरिकांच्या हातांचे ठसे आणि त्यांच्या मोबाइलमधील डेटा चोरी करण्याचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. सध्या चिनी अपच्या माध्यमातून भारतीयांची हेरगिरी करण्याचेही प्रकार सुरू आहेत. अशा हेरगिरीचे ठोस पुरावे उपलब्ध नसले तरीही काळजी घेणं गरजेचं आहे. ही अप गूगल प्ले स्टोअरच्या माध्यमातून आपली सेवा पुरवतात किंवा इतर जाहिरातील करतात त्यामुळे ग्राहक त्यांना बळी पडतात. त्यासाठी नागरिकांनी सावध रहावं असं सरकारचं आवाहन आहे.

First published:

Tags: Coronavirus