मुंबई, 11 जुलै : भारतात करोडो लोक स्मार्टफोनचा (Latest Smartphones) वापर करतात. मात्र आता यासोबतच इंटरनेटसुद्धा गरजेचं साधन झालं आहे. आधी 2G नंतर 3G आणि 4G इंटरनेट यूजर्सना वेध लागलेत ते म्हणजे 5G चे. देशात लवकरच 5G येणार अशी चर्चा सुरु आहे. काही मोबाईल कंपन्यांनी त्यांचे 5G स्मार्टफोन्स (5G Smartphones) बाजारात आणले आहेत. मात्र अजूनही ग्राहक 5Gची वाट बघताहेत. एकीकडे आपण 5G ची वाट बघत असतानाच दुसरीकडे मात्र अमेरिका (America)आणि चीन (China) हे देश 5Gच्या समोर जाऊन आता 6G च्या मागे लागले आहेत. 6G इंटरनेटचं पेटंट (Patent) मिळवण्यासाठी या देशांमध्ये चढाओढ सुरु आहे.
अमेरिका आणि चीन हे दोन्ही देश सध्या 6G इंटरनेट (6G Internet) जगात सर्वप्रथम लाँच करून देशाला पेटंट मिळवून देण्याच्या तयारीत आहेत. या सर्व प्रक्रियेला कमीतकमी 10 वर्ष असले तरी जगभरातील टेलिकॉम क्षेत्रात (Telecom Industry) आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी या दोन्ही देशांची शर्यत सुरू आहे. 5G इंटरनेटच्या लाँचिंगनंतर अमेरिकेमुळे चीनच्या काही कंपन्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. मात्र Huawei कंपनीनं 5G च्या आकर्षक किमती ग्राहकांना दिल्या त्यामुळे अमेरिकी कंपन्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यामुळे चीन 5G लीडरच्या भूमिकेत दिसून आला होता.
"5Gच्या तुलनेत 6G च्या लीडरशिपसाठीची चुरस अधिक प्रमाणात प्रभावी असू शकते. तसंच अमेरिकासुद्धा यावेळी यात स्वतःला मागे ठेवणार नाही." असं अमेरिकेतील एका कन्सल्टन्सी कंपनीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. हे सूचित करणारं ट्विटही तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं.
अमेरिकेनं 6Gची लीडरशिप मिळवण्यासाठी 'नेक्स्ट जी अलायंस' ला सुरुवात केली आहे. यात काही मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. ॲपल, AT&T, Qualcomm, गुगल, सॅमसंगसारख्या मोठ्या कंपन्या या युतीत सामील आहेत. मात्र अमेरिकेनं चीनच्या कुठल्याही कंपनीला यात जागा दिलेली नाही. त्यामुळे अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांतील संघर्ष दिसून येत आहे.
हे वाचा - ना ब्लू टीक, ना मेसेज रीड झाल्याचं समजणार; WhatsApp चं नवं फीचर असं करेल काम
मात्र चीनही अमेरिकेपेक्षा कमी नाही. चीन 6G लीडरशिप मिळवण्याच्या प्रक्रियेत आधीपासूनच पावलं उचलत आहे. टेलिकॉम उपकरणं बनवणारी कंपनी ZTEनं चीनच्या Unicom Hong Kong या कंपनीसोबत मिळून 6G इंटरनेटवर प्रभावीपणे काम करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे चीननं नोव्हेंबरमध्ये 6G ट्रान्समिशनसाठी एयरवेव्सची चाचणी करण्यासाठी एक सॅटेलाईट लाँच केलं होतं. तसंच कॅनेडामध्ये Huawei कंपनीचं एक 6G संशोधन केंद्रही आहे.
जगातील अनेक देश 5G टेक्नॉलॉजिचा विरोध करत आहेत तर काही समर्थनात आहेत. जापान, ऑस्ट्रेलिया, स्वीडन आणि इंग्लंड यांसारख्या देशांनी आपल्या 5Gच्या मध्यमातून या फर्मला बंद केलंय. तर रूस, फिलीपींस, थायलंड आणि अफ्रीका या देशांनी चिनी कंपनीचं स्वागत केलं आहे. विशेषश म्हणजे गेल्या वर्षी NOKIAसारख्या मोठ्या कंपनीनंही 6G वायरलेस प्रोजेक्टची सुरुवात केली आहे ज्यामध्ये अनेक युनिव्हर्सिटींचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, China, High speed internet, Technology