मुंबई, 27 सप्टेंबर: इंटरनेटमुळं आपली बरीच कामं काही मिनिटांत आणि घरबसल्या होत आहेत. पूर्वीप्रमाणेच आता लोकांना प्रत्येक कामासाठी घराबाहेर पडावं लागत नाही, कारण खरेदी, खाद्यपदार्थ, कोणतंही बिल भरणं, कोणताही जॉब फॉर्म भरणं, ऑनलाइन बँकिंग अशा कितीतरी गोष्टी एका क्लिकवर घरबसल्या करता येतात. यासाठी लोक मोबाईलवर अनेक प्रकारचे अॅप्स वापरतात, तर दुसरीकडे लोक डेस्कटॉपवर म्हणजेच कंप्यूटर किंवा लॅपटॉपवर Google Chrome ब्राउझर वापरतात. आपण गुगल क्रोमच्या माध्यमातून अनेक कामं करतो. पण जर तुम्ही गुगल ब्राउझर वापरत असाल तर तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे नाहीतर तुम्ही अडचणीत येऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया… हा आहे धोका- खरं तर काहीच दिवसांपूर्वी इंडियन कंप्यूटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीमने डेस्कटॉपसाठी Google Chrome मध्ये सुरक्षेतील त्रुटी नोंदवल्या होत्या. ही टीम आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत येते. या असुरक्षिततेचा फायदा घेऊन हॅकर्स वापरकर्त्याचा संगणक हॅक करू शकतात, असे टीमच्या वतीनं सांगण्यात आलं. हॅकर्स लोकांच्या सिस्टमला क्राफ्टेड रिक्वेस्ट पाठवून आर्बिटरी कोड एग्जीक्यूट आणण्याची परवानगी देतं. म्हणूनच तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा हे फसवणूक करणारे तुमचा संगणक हॅक करून तुमचे बँक खातं रिकामं करू शकतात. हेही वाचा: WhatsApp वर आता बुलेटच्या स्पीडनं शेअर होणार Document, लवकरच येणार नवं फीचर या गोष्टी लक्षात ठेवा :- तुम्ही गुगल क्रोम वापरत असाल आणि स्वतःला सुरक्षित ठेवू इच्छित असाल, तर त्यामुळं तुम्ही तुमचा ब्राउझर अपडेट करावा. अपडेट येताच तो अपडेट करणं योग्य राहील. गुगल क्रोम वापरत असताना, लक्षात घ्या की कोणत्याही बनावट लिंक किंवा अज्ञात लिंकवर क्लिक करू नका किंवा वेबसाइटला भेट देऊ नका. तसेच, कोणत्याही वेबसाइटवर तुमची बँकिंग माहिती जतन करू नका. असं केल्यास तुमचं खातं खाली होण्याचा धोका असतो. सायबर गुन्हेगार अशा संधीची वाटतच बघत असतात, त्यामुळं गुगल क्रोम वापरताना वरील गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.