नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर व्हिकल नियमांमध्ये काही बदल-दुरुस्ती केली आहे. त्यामुळे आता वाहनांच्या रजिस्ट्रेशन डॉक्यूमेंटमध्ये ओनरशिप डिटेल (Ownership details) स्पष्टपणे जोडावे लागणार आहेत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी हे नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. मोटर वाहन नियमांमध्ये केलेल्या दुरुस्तीचा फायदा दिव्यांगांना होणार आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोटर वाहनांच्या रजिस्ट्रेशनसाठी जे फॉर्म दिले जात होते, त्यात वाहनांच्या ओनरशिप डिटेलची स्पष्टपणे नोंद होत नव्हती. ही बाब अनेकदा मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर मंत्रालयाने सेंट्रल मोटर व्हिकल नियम - 1989च्या फॉर्म 20 मध्ये दुरुस्ती केली आणि याबाबतचं नोटिफिकेशन 22 ऑक्टोबर 2020 रोजी जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे आता वाहनांच्या रजिस्ट्रेशनवेळी ओनरशिप डिटेल्स स्पष्टपणे नोंदवणं आवश्यक असणार आहे.
(वाचा - ..अन्यथा 19 ऑक्टोबरनंतर अडचण वाढणार; वाहनांवरील Number Plate बाबत RTO ची महत्त्वपूर्ण घोषणा)
ओनरशिप डिटेल्स वेग-वेगळ्या प्रकारात नोंद होतील -
मोटर व्हिकल नियमांतील दुरुस्तीनंतर, वाहनांच्या रजिस्ट्रेशनमध्ये ओनरशिप डिटेल्स वेग-वेगळ्या श्रेणीमध्ये नोंदवले जातील. यात ऑटोनोमस बॉडी, सेंट्रल गव्हर्नमेंट, चॅरिटेबल ट्रस्ट, ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल, दिव्यांगजन, एज्युकेशनल इंस्टिट्यूट, लोकल अथॉरिटी, मल्टीपल ओनर्स, पोलिस डिपार्टमेंट इत्यादी श्रेणी सामिल आहेत.
(वाचा - WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी; आता फ्रीमध्ये मिळणार नाही ही सुविधा)
दिव्यांगांना सरकारी योजनांचा लाभ -
दिव्यांगांना मोटर व्हिकलची खरेदी, ओनरशिप आणि ऑपरेशनमध्ये सरकारकडून विविध योजनांतर्गत जीएसटी आणि इतर सूट दिली जाते. सेंट्रल मोटर व्हिकल नियमांतर्गत आता ज्या डिटेल्सची नोंद होते, त्यात दिव्यांगांचा तपशील नोंदवला जात नाही. त्यामुळे दिव्यांग सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे आता या दुरुस्तीनंतर ओनरशिप डिटेल्स स्पष्टपणे नोंदवले जाणार असून दिव्यांग विविध योजनांचा लाभ घेऊ शकतील.
(वाचा - देशात कोणतं Aadhaar Card आहे मान्य; UIDAI ने दिली संपूर्ण माहिती)