नवी दिल्ली, 9 डिसेंबर : दूरसंचार विभागाने (DoT) बुधवारी (8 डिसेंबर 21) एक नवीन नियम लागू केला आहे. या विभागाने तसा आदेशही काढला असून त्यामध्ये एखाद्या यूजरकडे किती सिम कार्ड (SIM card). असावेत, हे स्पष्ट करण्यात आलं आहे. दूरसंचार विभागाच्या (Telecom Department) नवीन नियमांनुसार आता 9 पेक्षा जास्त सिम असणाऱ्या यूजरला सिमकार्डचे व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक झालं आहे.
जर या सिम कार्डचं व्हेरिफिकेशन केलं नाही तर ते बंद करण्यात येईल. तसेच जम्मू आणि काश्मीर (J&K) आणि ईशान्य भारतातील (North East) राज्यांसाठी सिम कार्डची ही संख्या फक्त सहा ठेवण्यात आली आहे. दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांना नियमांनुसार वापरात नसलेले सर्व मोबाइल नंबर डेटाबेसमधून काढून टाकण्यास सांगितले आहे.
WhatsApp वर चुकूनही करू नका या 8 चुका, अकाउंट कायमसाठी होईल बॅन
नेमका काय आहे आदेश?
दूरसंचार विभागाच्या आदेशात म्हटलं आहे की, जर ग्राहकांकडे परवानगी पेक्षा जास्त सिम कार्ड आढळली तर त्यांना त्यांच्या आवडीचे सिम ठेवण्याचा आणि बाकीची बंद करण्याचा ऑप्शन दिला जाईल. मात्र, ही सिम कार्डची संख्या 9 पेक्षा जास्त नसावी. विभागाने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान कोणत्याही ग्राहकाकडे सर्व दूरसंचार कंपन्यांची मिळून निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सिमकार्ड असल्याचे आढळून आल्यास सर्व सिम कार्डचे पुन्हा व्हेरिफिकेशन केले जाईल. आर्थिक गुन्हे, आक्षेपार्ह कॉल, ऑटोमेटेड कॉल आणि फसवणुकीच्या घटनांचा तपास करण्याच्या उद्देशाने दूरसंचार विभागाने हे पाऊल उचलले आहे.
नंबर पोर्टेबिलिटीसाठी TRAI चे कठोर आदेश, पाहा तुमच्यावर काय परिणाम होणार
तर, 30 दिवसांत सिम बंद करा
दूरसंचार विभागाने सर्व दूरसंचार ऑपरेटर्सना 9 पेक्षा जास्त सिम कार्ड असलेल्या यूजर्सला नोटिफिकेशन पाठवण्याचे आदेश दिले आहेत. अशा सिम कार्डवरील सर्व आउटगोइंग कॉल 30 दिवसांच्या आत बंद करावेत. तर इनकमिंग कॉल 45 दिवसांत बंद करावेत, असेही आदेश दिले आहेत. तसेच मोबाइल सिम यूजरला त्याच्याकडे असलेले एक्स्ट्रा सिम कार्ड सरेंडर करण्याचा ऑप्शन देखील दिला आहे.
नवीन स्मार्टफोनमध्ये दोन सिम सिम कार्ड ठेवण्याची सोय आहे. आधी मोबाइलमध्ये एकच सिम कार्ड असायचे. परंतु, आता यूजर एकाच मोबाइलमध्ये दोन सिम कार्ड वापरतो. अनेकांना तर एकापेक्षा जास्त मोबाइल वापरण्याची सवय असते. त्यामुळे त्यांच्याकडे असणाऱ्या सिम कार्डची संख्या ही जास्त असते. मात्र, दूरसंचार विभागाच्या नवीन नियमानुसार यूजरला सिम कार्ड ठेवण्यास काही बंधने घालण्यात आली आहे. 9 पेक्षा जास्त सिम ठेवणाऱ्या यूजरला सिम कार्डचे व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक असणार आहे. जर तुम्ही असे केले नाही, तर तुमचे सिम कार्ड डिअॅक्टिवेट म्हणजेच बंद करण्यात येणार आहे असंही विभागाने स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.