मुंबई, 26 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून फोनवर बोलताना कॉलमध्ये ड्रॉप होणं, कॉल न लागणं, डाटा स्पीड स्लो मिळणं अशा समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावं लागत आहे. यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. या समस्या तातडीने सोडवाव्यात अशी ग्राहकांची मागणी आहे. ग्राहकांच्या या समस्यांच्या अनुषंगाने सरकारने टेलिकॉम कंपन्यांसोबत एका महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत ग्राहकांच्या या समस्यांच्या अनुषंगाने चर्चा होणार असून, तोडगा निघण्याचीदेखील शक्यता आहे. या वेळी सरकार टेलिकॉम कंपन्यांना सेवा सुधारण्याबाबत काही सूचना करणार आहे.
‘कॉल ड्रॉप’ आणि ‘स्लो डाटा स्पीड’ या समस्यांपासून तुमची लवकरच सुटका होऊ शकते. कारण दूरसंचार विभाग आता यावर कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी `सीएनबीसी आवाज`ला दिली.सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार लवकरच टेलिकॉम कंपन्यांना सूचना देणार आहे. या साठी दूरसंचार विभागाच्या सचिवांनी 28 डिसेंबरला टेलिकॉम कंपन्यासोबत बैठक ही बोलवली आहे.
हेही वाचा : सोशल मीडियावर करायची आहे हवा? मग या वेबसाईट्सद्वारे फोटोला द्या नवा टच
दूरसंचार विभाग टेलिकॉम कंपन्यांना सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी सूचना देणार आहे. दूरसंचार विभागाच्या सचिवांनी टेलिकॉम कंपन्यासोबत बैठक बोलवली आहे. 28 डिसेंबरला टेलिकॉम कंपन्यांसोबत बैठक होईल. या बैठकीत टेलिकॉम कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी होतील.
सेवेत अचानक बिघाड का झाला?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5G नेटवर्क सुरू झाल्यामुळे सेवांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या सेवांच्या दर्जावर सरकार खूश नाही. या संदर्भात दूरसंचार विभागाने ट्रायला (TRAI) पत्र लिहिलं आहे. सेवांविषयीचे नियम अधिक कडक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा : तुमचे आधार कार्ड 10 वर्षांचे झाले असेल तर ही गोष्ट लगेच करुन घ्या अन्यथा.. UIDAI चा इशारा
सरकारने ट्राय आणि टेलिकॉम कंपन्यांना पत्र लिहिलं असून, त्यात म्हटलं आहे की ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांसोबत मिळून समस्यांवर तोडगा काढावा. देशात 115 कोटी सब्स्क्रायबर्स आहेत मात्र त्या तुलनेत पायाभूत सुविधा कमकुवत आहेत. कॉल ड्रॉप आणि स्लो डाटा स्पीडसारख्या समस्या दूर होण्यासाठी पायाभूत सुविधा भक्कम होणं गरजेचं आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G नेटवर्क सुविधा सुरू झाली आहे. एकीकडे 5G मुळे डाटा स्पीड, कॉलिंगशी संबंधित सेवा सुधारत असताना दुसरीकडे ग्राहकांना कॉल ड्रॉप आणि स्लो डाटा स्पीडसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे यावर तातडीने तोडगा निघावा, अशी ग्राहकांची मागणी आहे. त्यामुळे देशभरातील ग्राहकांचं या बैठकीकडे लक्ष लागलं आहे. या समस्या तातडीने दूर व्हाव्यात, अशी अपेक्षा ग्राहक व्यक्त करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: 5G