नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : गुगल प्ले स्टोर (Google Play Store) अँड्रॉईड स्मार्टफोनचे (Android Smartphone) अॅप्स डाउनलोड करण्यासाठी सर्वात सुरक्षित सोर्स मानला जातो. परंतु गुगल प्ले स्टोरवर असे काही अॅप्स लिस्टेड आहेत, जे तुमच्या मोबाईलची सुरक्षा धोक्यात टाकतात. Google आपल्या अॅप स्टोरची तपासणी करतं आणि वेळोवेळी त्यावर कारवाईही करतं. परंतु तरीही या प्लॅटफॉर्मवर असे अॅप्स आहेत, जे धोकादायक ठरू शकतात.
गुगलने प्ले स्टोरवर असणारे काही धोकादायक अॅप्स नुकतेच बॅन केले आहेत. या अॅप्सचा वापर हॅकर्स त्यांच्या खासगी फायद्यासाठी, युजर्सच्या फसवणुकीसाठी आणि त्यांचे पर्सनल डिटेल्स चोरी करण्यासाठी करत होते. तुमच्याही फोनमध्ये असे काही अॅप्स असतील, तर ते लगेच डिलीट करणं गरजेचं आहे.
डिजीटल सुरक्षा कंपनी अवास्टने (Avast) नुकतंच प्लॅटफॉर्मवर 19,000 हून अधिक अॅपमध्ये काही त्रुटी आढळल्या असल्याचं सांगितलं. चुकीच्या कॉन्फिगरेशनसह अॅपमध्ये अशा त्रुटी आढळल्या, ज्याद्वारे युजर्सची वैयक्तिक माहिती लीक होऊ शकत होती.
Avast ने दिलेल्या माहितीनुसार, युजर्सच्या फायरबेस डेटाच्या चुकीच्या कॉन्फिगरेशनमुळे 19,300 हून अधिक अँड्रॉईड अॅप्स लोकांसमोर उघड झाले. फायरबेस हे एक उपकरण आहे, ज्याचा वापर Android डेव्हलपर्स युजर्सचा डेटा स्टोर करण्यासाठी करू शकतात.
या गोष्टी लक्षात ठेवा -
- Google Play Store वरुन अॅप्स वेरिफाय केल्याशिवाय डाउनलोड करू नका. अॅपवर दिलेले डिटेल्स लक्षपूर्वक वाचा.
- चुकीच्या, फेक अॅपमध्ये एक किंवा दोन स्पेलिंग चुका असतात. त्यामुळे त्याकडे लक्षपूर्वक पाहा.
- अॅप डाउनलोड करण्यापूर्वी इतर युजर्सचे रिव्ह्यू वाचा. मोबाईलमध्ये चांगल्या अँटीव्हायरसचा वापर करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.